शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

मापांची दुनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 01:37 IST

व्यवहारातील मापांची दुनिया कशी असते, व्यवहार करताना त्या ठिकाणी कोणती मापं वापरली जातात, त्या मापांचा आकार, वजन, ते कोणत्या व्यवहारासाठी आणि कसे वापरले जातात याचा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अशोक कौतिक कोळी यांनी प्रत्यक्ष बाजारात फिरून घेतलेला मनोरंजक आणि माहितीपूर्ण आढावा.

शेरभर सोनं मोडलं आन् घरात बांदर घातलं ! अशी एक म्हण बाजारात माझ्या कानावर पडली. दोन महिलांमधील संवादादरम्यान ही म्हण होती. त्यांचं इतरही बोलणं मी ऐकलं. त्या बहुतेक आपल्या घरातील कटकटीविषयी बोलत होत्या. भरपूर खर्च करून, गाजावाजा करून घरात आणलेली सून व्यवस्थित निघाली नाही, अशी तक्रार वरील म्हण उच्चारणारी महिला करत होती.मला त्या दोघींमधील संवाद बोलका वाटला. सदर संवादातील सु:ख-दु:खाचा, खयाली खुशालीचा व चौकशीचा भाग सोडला तर त्याहून अधिक काहीतरी माझ्या हाती लागलं. ते म्हणजे वरील म्हण! त्या महिलांच्या बोलण्यातील ह्या म्हणीने माझं लक्ष वेधलं. विशेष करून ‘शेरभर सोनं कसं असू शकतं? हा प्रश्न मला पडला. सोनं तर ग्रॅममध्ये मिळतं.’माझ्या डोक्यात विचारांचा भुगा सुरू झाला. तेथून मी पुढे बाजारात गेलो. योगायोगाने त्या दिवशी आठवडी बाजार होता. छोट्या-मोठ्या विक्रेत्यांच्या दुकानांनी बाजार सजलेला होता. ग्रामीण भागातील आठवडी बाजाराचे आकर्षण अजूनही कायम आहे. खेड्यापाड्यांंवरील लोक मोठ्या आनंदाने त्यात सहभागी होतात. आठवडाभरासाठी लागणाऱ्या वानसामानाच्या व इतरही चिजा घेऊन जातात.कशी चालते ही आठवडी बाजारातील खरेदी-विक्री? आजच्या संगणकीय आॅनलाईन शॉपिंगच्या-मॉलच्या जमान्यातील ग्रामीण भागातील ही विक्री व्यवस्था कशी आहे? कशी आहे येथील मापांची दुनिया? हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या मनात वाढली. त्यासाठी मला विशेष असे काही प्रयत्न करावे लागले नाही. कारण मीही त्या ग्रामीण व्यवस्थेचा भाग होतोच. योगायोगाने मीही आठवडी बाजारात गेलेलो होतोच.एव्हाना नित्यनेमाने आपण दररोज काही ना काही खरेदी करत असतोच. लहानपणापासून आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या, अनुभवलेल्या असतात. काळानुरूप त्यात अनेक बदल होत असतात. ते बदल आपल्या लक्षात येतातच असे नाही. काळानुरूप आपणही बदलत असतो, बदल स्वीकारत असतो. आॅनलाईन शॉपिंगच्या मोठमोठ्या अजरत्र मॉलच्या दुनियेत आपण आज वावरत आहोत. तेथील अंदाधुंदी, मौजमजा व झगमगाट अनुभवत आहेत.ह्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अस्तित्वात असलेली मापनाची, मोजमापाची-मापांची दुनिया कशी आहे हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरते. तसा प्रयत्न मी करून पाहिला. त्या प्रयत्नांतच बाजारात शिरलो. तसा नेहमीच मी बाजारात जात असतो. आज मात्र सहेतुक मापांची दुनिया शोधू लागलो. सर्वात आधी ‘शेरभर सोनं’ कसं असतं हे जाणून घेण्यासाठी सराफ बाजारात गेलो.सराफ बाजारातील बहुतेक दुकानांमध्ये जुन्या पद्धतीचे तराजू काटे दिसून आले. ह्या दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक काटे असतील, असा माझा समज होता. मात्र तो खोटा ठरला. इलेक्ट्रीक काट्यावर विश्वास नाही. त्यामुळे आम्ही त्यांना तराजू काट्यावर सोनं, चांदी इत्यादी मौल्यवान वस्तू मोजून देतो. त्यासाठी वापरात असलेली सराफी मापन पद्धती त्यांनी समजून सांगितली.सराफी व्यवसायातील सर्वात छोटे माप आहे. ‘गुंज.’ गुंज हे ग्रामीण भागातील एका वेलवर्गीय वनस्पतीचं नाव आहे. ही वनस्पती हिरवीगार, टवटवीत पानांची व आकर्षक फुलधारणा करणारी असते. मुख्य म्हणजे या वनस्पतींच्या फळातून जे बी निघते त्यास गुंज असे म्हणतात. ही गुंज लालचुटूक रंगाची असून, तिवर काळा डोळा असतो. जणू मंगळसूत्राच्या मंगलपोत्यामधील शोभीवंत मणी जणू! गुंज ही सर्वांनाच हवीहवीशी वाटचारी, शुभ मानली जाणारी वनस्पती बी आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी तिचीही आवर्जून पूजा होते.त्यामुळे गुंज हे सोने मापनाचे प्रथम परिणाम आहे. एक गुंज, दोन गुंज अशी मापन पद्धती आहे. मात्र एक गुंज म्हणजे आजच्या मापनातील किती वजन? तेव्हा असे कळले की, एक गुंज म्हणजे १०० मिलीग्रॅम, दोन गुंज म्हणजे २०० मिलीग्रॅम, पाच गुंज म्हणजे ५०० मिलीग्रॅम म्हणजेच अर्धा ग्रॅम, आता प्रत्यक्ष गुंज बी न वापरता त्या प्रमाणात मिलीग्रॅममध्ये वजनमापे बनविलेली आहेत.एक ग्रॅमपर्यंतचा आणि त्या खालोखालचा व्यवहार हा गुंजमध्ये होतो, तर एक ग्रॅमच्या पुढील व्यवहार ग्रॅम आणि तोड्यांमध्ये होतो. गुंज नंतरचे सोने मोजण्याचे परिमाण आहे तोळा ! एक तोळा, दोन तोळे, पाच-दहा तोळे अशी ही गणना आहे. एक तोळा म्हणजे दहा ग्रॅम सोने, चांदीच्या बाबतीत हेच परिमाण ‘भार’मध्ये मोजले जाते. दहा ग्रॅम चांदी म्हणजे एक भार चांदी.सराफा बाजारातील ‘गुंज’, ‘तोळा’ आणि ‘भार’ ही मापन पद्धती समजून घेताना मला आनंदच वाटला. मात्र शेरभर सोन्याचं कुतूहल काही गेल्या शमायला तयार नव्हतं. तेव्हा सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं की, पूर्वी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत होता. मोठ्या प्रमाणात सोन्याची उपलब्धी होती. शिवाय आजच्यासारखी महागाईही नव्हती. पाऊसपाणी भरपूर पडायचा. दुष्काळी, अवकाळी दिवस नसायचे. समृद्धता ठासून भरलेली असायची. अशावेळेला शेर, पावशेर, अस्तेर अशा प्रमाणात सोन्याची खरेदी व्हायची.माझ्या मनातील अढीचा तिढा हळूहळू सुटू लागला. मला असेही कळले की गुंज, तोळा भर या अगोदर सोने मापनाची पद्धत वेगळी होती. जी शेर, पावशेरमध्ये होती. सोबतच असेही कळले की, शेर हे वचनाचे परिमाण नसून मापनाचे परिमाण आहे आणि ते ग्रामीण भागातील मापनाचे मूलभूत, सर्वदूर वापरात असलेले परिमाण आहे. पुरातन काळापासून वापरात असलेले हे एकमेव साधन आहे. (पूर्वार्ध)-डॉ.अशोक कौतिक कोळी, जामनेर

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर