शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाची अधिसभा वादळी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

जळगाव : महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदीचा भंग करून केलेल्या नेमणुकांसह अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराबाबत दीड वर्ष उलटले ...

जळगाव : महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदीचा भंग करून केलेल्या नेमणुकांसह अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराबाबत दीड वर्ष उलटले तरी समिती नेमण्यात न आल्याच्या मुद्यावरून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची अधिसभा बैठक गाजणार आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणाऱ्या अर्थसंकल्पाची अधिसभा बैठक आता मंगळवार, २९ रोजी होणार आहे. ही बैठक २५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु, कुलगुरूंची उशिरा एंट्री व बैठक ऑफलाइनचं घ्यावी, या मुद्यावरून सदस्यांनी दीड तास गोंधळ घातल्यानंतर बैठक स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, ही बैठक आताही ऑनलाइनचं घेतली जाणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता प्रभारी कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. विविध विषयांवर अधिसभा गाजणार आहे. यात विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींचा भंग करून झालेल्या नेमणुका यांच्यासह अधिसभा सदस्यांना अधिसभेत चर्चेसाठी आवश्यक असलेली माहिती पुरविली जात नाही व एका अधिकाऱ्याच्या गैरकारभाराबाबत तत्कालीन कुलगुरुंनी चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते. तरीही चौकशी समिती नेमण्यात आलेली नसल्याच्या मुद्यावरून विद्यापीठ प्रशासनाला चांगलेचं धारेवर धरले जाणार आहे.

ऑफलाइनसाठी गोंधळ, तरीही बैठक ऑनलाइन

२५ मार्च रोजी आयोजित अधिसभा ही पुढे ढकलण्यात यावी व ती ऑफलाइन पध्दतीने घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी करीत अधिसभा सदस्यांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर ऑफलाइन बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, मंगळवारी आयोजित बैैठक ही ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. त्यामुळे या मुद्यावरून देखील बैठक गाजण्याची शक्यता आहे.

मुलाखती स्थगित

काही दिवसांपूर्वी अधिष्ठाता व डायरेक्टर पदासाठी विद्यापीठाकडून जाहिरात काढण्यात आली होती. मात्र, या पदांसाठीच्या मुलाखती काही महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली असल्याची माहिती कुलगुरू यांनी लोकमतशी बोलताना दिली. नियमित कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर ह्या मुलाखती होण्याची शक्यता आहे.