शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या आपत्तीला आता तरी आळा बसेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

पाच महिन्यांपासून संसर्ग कमी होऊन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. हा दिलासा मिळत असतानाच गर्दी ...

पाच महिन्यांपासून संसर्ग कमी होऊन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. हा दिलासा मिळत असतानाच गर्दी वाढू लागल्याने व नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाने पुन्हा आता डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा आता जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू झाला आहेत. यात पाच ते सहा दिवसांपासून आवाहन केले जात आहे, मात्र लग्नांच्या ठिकाणी गर्दी टाळ‌ावी, मास्कचा वापर करावा अशा साध्या-साध्या नियमांचे पालन होत नसल्याने गेल्या वर्षाप्रमाणे आता पुन्हा आदेशांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत असले तरी नियमांचे पालन होत नसल्यास उपाययोजनांचा उपयोग होणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासन उपाययोजना करीत असल्याने आता तरी नागरिकांची साथ मिळून कोरोनाच्या आपत्तीला आळा बसू शकेल की नाही, हे नियम पाळण्यावरच अवलंबून राहणार आहे. जिल्ह्यात लग्नाच्या ठिकाणी गर्दी होऊ लागल्याने व कोरोनाचे गांभीर्य नसल्याने रविवारी तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वत: रस्त्यावर उतरून धडक कारवाईचे सत्र सुरू केले. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसू शकेल. जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्यामुळे आता आदेशांचेही सत्र सुरू झाले असून या पाठोपाठ आता कठोर प्रशासकीय उपाययोजना जाहीर केल्यामुळे कोरोनाच्या आपत्तीलाही आळा बसू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.