का व्हायची तपासात दिरंगाई
दुचाकी चोरी झाली तर गुन्हाच दाखल केला जात नव्हता. केवळ अर्ज घेऊन तक्रारदाराला परत पाठविले जात होते. गुन्हा दाखल झालाच तर विमा कवच असल्यामुळे मालकाला कंपनीकडून मोबदला मिळाल्यावर तक्रारदार पाठपुरावा करीत नव्हता. त्यामुळे तपासी अंमलदारही गांभीर्याने तपास करीत नव्हता. गुन्हाच दाखल नाही किंवा तपासच होत नसल्याने गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डॉ. मुंढे यांनी एकाच अंमलदाराकडे तपास सोपविला. त्याचा परिणाम म्हणून पोलीस कामाला लागले व गुन्हे उघडकीस येण्यासह दुचाकीही मिळू लागल्या आहेत.
एलसीबीने शोधल्या ९५ दुचाकी
तपासाची स्वतंत्र यंत्रणा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेवरही पोलीस अधीक्षकांनी जबाबदारी सोपविली होती. या शाखेने सात महिन्यांत ९५ दुचाकी शोधून काढण्यासह ५१ आरोपींना अटक केली आहे. मार्च महिन्यात ४९, तर मे महिन्यात ५३ दुचाकी चोरी झालेल्या असताना केवळ प्रत्येकी २ दुचाकीच मिळून आल्याने डॉ. मुंढे यांनी गुन्ह्याच्या तपासाची कार्यपद्धत बदलली.
कोट...
दुचाकी चोरीचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचा शोध लागावा व चोरट्यांना आळा बसावा यासाठीच कार्यपद्धतीत बदल करण्यात आला. स्वतंत्र जबाबदारी सोपविल्यामुळे अंमलदाराला कोणताही बहाणा करता येत नाही. तपास करणे आवश्यकच नाही तर महिन्याला आढावा घेण्यात येत असल्याने काळजीपूर्वक तपास केला जातो. यापुढे इतर गुन्ह्यांच्या तपासात देखील काही बदल केले जाणार आहेत.
-डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक
एक नजर दुचाकीच्या घटनांवर
महिना चोरी सापडल्या
जानेवारी - ७३ - १०
फेब्रुवारी - ६ ९ - ०६
मार्च - ४९ - ०२
एप्रिल - ५३ - ०२
मे - ८७ - २३
जून - ७४ - १४
जुलै - ६५ - १२
एकूण - ४७० - ६९