शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

बंदकडे कोणी लक्ष देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:26 IST

व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे मोठे नुकसान

विजयकुमार सैतवालजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीची पाडलेली भिंत पुन्हा बांधून दिली जात नसल्याने व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे मोठे नुकसान होत असले तरी त्यावर तोडगा निघत नसल्याने या कडे कोणी लक्ष देईल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.परवानगी नसताना व्यापारी संकुलासाठी कृषी उत्त्पन्न बाजार समितीची तीनशे मीटर भिंत पाडण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. त्यानंतर भिंत बांधून देण्याचे आश्वासन मिळाल्याने व्यापाºयांनी बंद मागे घेतला. मात्र आश्वासनानुसार काम सुरू होत नसल्याने जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनने पुन्हा १७ जूनपासून बेमुदत बंद पुकारला आहे़ आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने व्यापाºयांनी लोकप्रतिनीधींना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लागवण्याची मागणी केली. मात्र बंदला दोन आठवडे होत आले तरी तरी त्याकडे कानाडोळाच होत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. या प्रकरणात काही मोजक्या मंडळींसाठी शेकडो व्यापाºयांना वेठीस धरले जात असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. भिंत बांधून देण्याची मागणी असली तरी राजकीय दबावतंत्राचा वापर करून विकासकाला झुकते माप दिले जात असल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यापाºयांसह शेतकरीही वेठीस धरले जात असल्याचा सूर आहे. पुढे विधानसभा निवडणुका असल्याने व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रामीण भागातील अधिकाधिक संचालक असल्याने त्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी जात नसल्याचा आरोप केला जात आहे. या संचालकांच्या विरोधात भूमिका घेतल्यास निवडणुकीवेळी परिणाम होऊ शकतो, अशी भीती असल्याने निवडणुकांवर डोळा ठेवून काहीही हालचाली होत नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे सहकार खात्याशी निगडीत हा विषय असला तरी व सहकार राज्यमंत्रीही जिल्ह्यातीलच असले तरी तेच संचालक मंडळाचे नेते असल्याने संचालकांना ते नाराज करू शकत नसल्याचा सूर व्यापाºयांमध्ये आहे.या बंदमुळे व्यापारी, शेतकरी यांच्यासह जळगावातील मोठा उद्योग असलेल्या दालमिललादेखील फटका आहे. त्यामुळे यावर तत्काळ तोडगा काढणे गरजेचे असल्याचा सूर आहे. या बंदमुळे धान्यासह कडधान्याचीही आवक बंद असल्याने त्याचा फटका दालमिलला बसू लागला आहे. स्थानिक पातळीवर कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितींसह विदर्भातून कच्चा माल आणण्याची वेळ दालमिल चालकांवर आली आहे. विशेष म्हणजे हरभºयाच्या आयातीवर सरकारने पूर्णपणे बंदी घातलेली असल्याने त्याचा अधिक तुटवडा जाणवत आहे. माल खरेदी होत नसल्याने त्याचा परिणाम दालमिलवर होऊ लागला आहे. जळगावात ५० ते ५५ दालमिल असून येथे दररोज ७०० ते ८०० टन कच्चा माल लागतो. आधीच सरकारने एप्रिल महिन्यात कडधान्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याने केवळ १५ टक्केच कच्चा माल विदेशात आयात करता येत आहे. हे प्रमाण कमी होण्यासह आता बाजार समितीमधील बंदमुळे स्थानिक पातळीवर माल उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. जळगावात माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितीमधून कच्च्या मालाची खरेदी केली जात आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात माल उपलब्ध होत नसल्याने दालमिल चालकांना अकोला, अमरावती, खामगाव येथे धाव घेऊन तेथून कच्चा माल आणावा लागत आहे. यात प्रवास खर्च वाढल्याने दालमिल चालकांना भूर्दंड सहन करावा लागत आहे. कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने उत्पादनावरही थोडाफार परिणाम झाला आहे. इतर शहरांमधून कच्चामाल आणावा लागत असल्याने खर्च वाढला असला तरी मागणी नसल्याने डाळींचे भाव वाढविता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा भूर्दंड दालमिल चालकांनाच सहन करावा लागत आहे. जळगावातील उद्योगांची स्थिती बिकट असताना दालमिल कसेबसे सावरून उद्योग वाढीला हातभार लावत आहे. त्यात अशा प्रकारच्या बंदमुळे उद्योगांवर परिणाम होत असेल तर ते उद्योगांसाठी मारक असल्याने बंदसंदर्भात लोकप्रतिनिधी, अधिकाºयांनी लक्ष घालून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे दालमिल चालकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव