शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

काय प्राचार्य, तुम्हीपण ! चाइल्ड पाॅर्नोग्राफीचे व्हिडिओ केले व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर चाइल्ड पाॅर्नोग्राफीचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर चाइल्ड पाॅर्नोग्राफीचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यासह वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेल्या पाचोऱ्यातील विद्यार्थ्याला सायबर पोलिसांनी नुकतीच अटक केली.

चाइल्ड पॉर्नोग्राफीचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सात जणांविरुद्ध गेल्या महिन्यात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील तीन नावे महिलांची आहेत. सोशल मीडियावर अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्यास फेसबुकने बंदी घातलेली आहे, असे असतानाही फेसबुकवर अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर फेसबुकने महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार करून संशयितांची नावे व लोकेशन कळविले. त्यानुसार महाराष्ट्र सायबरने राज्यातील अकाउण्टधारकांची नावे निष्पन्न करून त्या त्या जिल्ह्याला कळविली होती. जळगाव जिल्ह्यात हे फोटो व व्हिडिओ शेअर करणाऱ्यांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन रमेश सोनवणे यांनी फिर्याद दिली. त्यावरून सौरभ संजय वाणी, अतुल व्यास, राॅकी पाटील, रेवती ठाकूर, सोनाली इंगळे व रक्षा सेठी या सात जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही नावे बनावट असल्याचे सांगितले जात आहे.

प्राचार्यांना दुसऱ्यांदा अटक

अशाच प्रकारचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अटक केलेल्या या प्राचार्याला यापूर्वीदेखील सायबर पोलिसांनी अटक केली होती. तेव्हादेखील हा प्राचार्य दोन दिवस पोलीस कोठडीत होता. आता १३ मे रोजी त्याला अटक करण्यात आली. १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत होता.

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सात जणांचे नावे पाठविली आहेत. या खातेदारांची माहिती फेसबुककडे पाठविण्यात आली असून, त्यांच्याकडील मोबाइल व निवासाचा पत्ता घेतल्यानंतर संबंधित व्यक्तींना अटक केली जात आहे, यात अजून काही जणांना अटक केली जाणार असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

चाइल्ड पाॅर्नोग्राफी सर्च करणेही गुन्हा

चाइल्ड पाॅर्नोग्राफी सर्च करणे, स्टोअर करणे व बघणे हा माहिती तंत्रज्ञान कायदा ६७ ब नुसार गुन्हा आहे. त्याशिवाय फेसबुक, इन्स्टाग्राम यासह इतर सोशल मीडियावर व्हायरल करणेदेखील गुन्हा असल्याचे पोलीस निरीक्षक हिरे यांनी सांगितले.

नॅशनल सेंटर फॉर मिसिंग एक्स्प्लॉइटेड चिल्ड्रन्स संस्थेची नजर

लहान मुलामुलींचे अश्लील फोटो, मजकूर व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर नॅशनल सेंटर फॉर मिसिंग एक्स्प्लॉइटेड चिल्ड्रन्स ही संस्था नजर ठेवून आहे. जेव्हा जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा ही संस्था संबंधित राज्याच्या सायबर पोलिसांना कळविते. त्यानंतर त्या राज्याचा सायबर सेल त्या त्या जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तीची माहिती कळविते.