शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात आॅनलाईनच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांचे बहिष्काराचे अस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:07 IST

आॅनलाइन बैठकीच्या नावाखाली सत्ताधारी नगरसेवकांनीच दुसऱ्यांदा बहिष्काराचे अस्त्र उघडल्याने वादाच्या भोवºयात आधीपासूनच सापडलेली बैठक शुक्रवारीही होऊ शकली नाही.

ठळक मुद्देमुक्ताईनगर नगरपंचायत बैठकसाडेपाच महिन्यांपासून बैठक नाही

मुक्ताईनगर, जि.जळगाव : गेल्या साडेपाच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीची मासिक बैठक झालेली नसताना आॅनलाइन बैठकीच्या नावाखाली सत्ताधारी नगरसेवकांनीच दुसऱ्यांदा बहिष्काराचे अस्त्र उघडल्याने वादाच्या भोवºयात आधीपासूनच सापडलेली बैठक शुक्रवारीही होऊ शकली नाही.साडेपाच महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे नगरपंचायतीची बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे शहरातील अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यातच २० आॅगस्ट रोजी नगरपंचायतीची बैठक आयोजित केली होती. मात्र ही बैठकही नगरविकास विभागाच्या आदेशानुसार आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आली. मात्र नगरसेवकांनी पूर्णपणे बहिष्कार या बैठकीवर टाकला होता. विशेष म्हणजे सत्ताधारी गटाचे गटनेते पीयूष मोरे यांनी पत्र देऊन ही बैठक आॅफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे २० आॅगस्टची बैठक तहकूब करण्यात आली होती. तीच बैठक २७ रोजी आॅनलाइन पद्धतीने पुन्हा एकदा नगराध्यक्षांनी आयोजित केली होती. या बैठकीला आॅनलाइन पद्धतीने ११ नगरसेवकांनी सहभाग नोंदवला. बैठकीच्या अजेंड्यावरील नऊ विषयात आॅनलाईन सभेत या नगरसेवकांनी सहभाग घेतला. त्यानंतर आवाज येत नाही, ऐकू येत नाही किंवा नेट समस्या यामुळे अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणावरून सर्व नगरसेवकांनी बैठकीतून माघार घेत नगरपंचायत कार्यालय गाठले. यादरम्यान आॅनलाईन बैठकीत सहभागी असताना बहुतांश नगरसेवकांनी आमचे आवाज मुद्दाम आॅनलाईन बैठक घेणाºयांमार्फत बंद करण्यात आल्याचा आरोप याप्रसंगी नगरसेवकांनी केला.याप्रसंगी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी नगरपंचायत आवारात येऊन पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी गटनेते पीयूष महाजन यांनी सांगितले की, मुक्ताईनगर नगरपंचायतद्वारा यापूर्वी घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यानच आम्ही रितसर पत्र देऊन आॅफलाइन पद्धतीने बैठक घेण्याची मागणी केली आहे. त्यासाठी सर्व सोशल डिस्टसिंग व इतर नियम पाळण्यास आम्ही तयार आहोत. मात्र तरीही शासकीय निर्देशानुसार आॅनलाईन बैठक घेण्यात आली व आम्ही त्यात सहभागीही झालो. परंतु तांत्रिक अडचणीमुळे विषय ऐकू येत नव्हते. आवाज येत नव्हता आणि लॉगआउट होण्याचे प्रमाण वाढल्याने आॅनलाइन पद्धतीची न घेता आॅफलाइन पद्धतीने सभागृहात अथवा नगरपंचायतीच्या मालकीच्या नाट्यगृहाच्या प्रशस्त हॉलमध्ये घेण्याची मागणी सर्व नगरसेवकांच्या वतीने केली.नगराध्यक्षा नजमा तडवी व उपनगराध्यक्षा मनीषा पाटील यांनी हा विषय जिल्हाधिकाºयांकडे मांडणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी नगरसेवक संतोष कोळी, शबाना बी आरिफ, नुसरत बी मेहबूब खान, बिल्किस बी अमानुल्लाखान, शमीम बी अहमदखान, मुकेश वानखेडे, साधना ससाने, बिल्किस बी आसिफ बागवान, शेख शकील शेख शकूर, शेख मस्तान शेख इमाम कुरेशी, कुंदा अनिल पाटील, नीलेश शिरसाट हे नगरसेवक उपस्थित होते.गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी गटाची असलेली नाराजी या बहिष्काराच्या निमित्ताने ठळकपणे दिसून आली. शिवसेनेचे गटनेते राजेंद्र हिवराळे, संतोष मराठे, सविता भलभले हे अनुपस्थित होते.शिवसेनेच्या नगरसेवकांचा विकासकामांच्या विषयांना कोणताही विरोध नव्हता. त्यामुळे आम्ही स्वतंत्ररित्या मुख्याधिकाºयांना दिलेल्या पत्रानुसार काही विषयांना मंजुरी आमच्यामार्फत दिली आहे. घनकचºयासारख्या विषयाला मात्र आमचा विरोध आहे.-राजेंद्र हिवराळे, गटनेता, शिवसेना, नगरपंचायत, बोदवडनगरविकास विभागाच्या आदेशानुसार आॅनलाइन पद्धतीनेच बैठक घेणे बंधनकारक आहे. पुढील बैठक घेण्याचा नगराध्यक्षांचा अधिकार आहे.-अश्विनी गायकवाड, मुख्याधिकारी, नगरपंचायत, बोदवड

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षMuktainagarमुक्ताईनगर