शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अंध व्यक्तींचा मार्ग उपकरणाद्वारे होणार सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST

भुसावळ : एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर रस्त्याने जाताना अनेक अडचणी अंध व्यक्तींना भेडसावत असतात. प्रत्येक वेळी ...

भुसावळ : एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर रस्त्याने जाताना अनेक अडचणी अंध व्यक्तींना भेडसावत असतात. प्रत्येक वेळी रस्ता सांगणाऱ्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवूनच पुढे जावे लागते. मात्र, आता अर्डिनो प्रणालीने रस्त्यातील अडथळ्यांची माहिती देणारे गॅझेट्स अंध व्यक्तींची मदत करणार आहे. दृष्टिबाधित लोकांना वेगाने जाण्यासाठी व अल्ट्रासोनिक लाटांच्या मदतीने जवळपासच्या अडथळ्यांना जाणून घेण्यास मदत होईल आणि आत्मविश्वासाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येईल.

भुसावळच्या हिंदी सेवा मंडळ संचालित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेतील अंतिम वर्षाच्या कोमल जाधव, धनश्री बऱ्हाटे, राजश्री बडगुजर या विद्यार्थिनींनी ‘द थर्ड आय फॉर द ब्लाइंड पीपल’ ही प्रणाली प्रा. धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केली आहे. हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी. तिवारी व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह, डीन डॉ. राहुल बारजिभे, विभागप्रमुख डॉ. गिरीष कुळकर्णी यांनी विद्यार्थिनींच्या या समाजोपयोगी प्रकल्पाचे कौतुक केले.

सेन्सर करणार काम

इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापरून हे उपकरण केले असून अर्डिनो युनो, अडथळे शोधण्यासाठी एचसी एसआर ०४ अल्ट्रासोनिक सेन्सर, डीसी मोटर,बझर, रेड एलईडी, स्विचेस, पॉवर बँक, हेडर पिन या साहित्याच्या मदतीने ही प्रणाली काम करणार आहे.

मिळते अडथळ्याची सूचना

डिझाइनसाठी कमी वेळ लागला व उत्पादन खर्चही कमी आहे. कमी वीज वापरासह हलके वजन असल्याने, अंध व्यक्ती हे यंत्र सर्व ठिकाणी नेऊ शकेल. ही प्रणाली वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना ओळखून (ध्वनिलहरी) लाटा तयार करतात आणि आवाज निर्माण होतो, तसेच समोर अडथळा आहे. असे लगेच सूचित होते. या प्रणालीच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात येणार आहे. लवकरच काही बदल करून ती बाजारात आणण्याचा प्रयत्न आहे, असे मार्गदर्शक प्रा. धीरज पाटील यांनी सांगितले.

अंधांना ठरणार उपयोगी !

या प्रणालीबाबत कोमल जाधव हिने सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेत करिअर घडवून स्वयंरोजगाराचा मार्ग तयार केला आहे याचा आनंद वाटतो. अंधांना प्रवासात विशेषत: अपरिचित ठिकाणी रस्ता नवखा असल्याने अडथळे येतात. त्यांना आम्ही विकसित केलेली ही प्रणाली उपयोगी ठरणार आहे. अंध व्यक्तींना येणाऱ्या अडचणी जाणून गरजेनुसार त्यात बदल हाती घेतले आहेत.