शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या गळतीमुळे पाण्याची नासाडी

By admin | Updated: January 12, 2017 01:00 IST

हिवरा मध्यम प्रकल्पाच्या जीर्ण झालेल्या कॅनालची गळती व दुरवस्थेमुळे लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे.

खडकदेवळा ता.पाचोरा  : पाचोरा  तालुक्यातील हिवरा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी  दिलेला लाखो रुपयाचा निधी केवळ गाळ काढणे  व इतर  थातूरमातूर कामात वापरला  आहे.  जीर्ण झालेल्या कॅनालची गळती व दुरवस्थेमुळे लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. हिवरा मध्यम प्रकल्पाच्या कालवा देखभाल दुरुस्तीसाठी मिळणा:या निधीतून जी कामे होतात ती कालव्याला पूरक अशी कामे होतच नाही. केवळ गाळ काढणे हेच काम कसेबसे उरकले जाते. कोठे गाळ काढला तर कोठे तसाच राहून जातो. कोठे कालव्यातील झाडेझुडुपे तोडली जातात तर काही ठिकाणी तशीच ठेवली जातात. पाटचा:यांची मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. कालवा दुरुस्तीचे काम होत नाही त्यामुळेच आज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. धरणात 47.20 टक्के जलसाठाया प्रकल्पातून 19 डिसेंबर 2016 रोजी सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले. यावेळी  जलसाठा 67.30 टक्के होता. आजमितीला या धरणात 47.20 टक्के जलसाठा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी 35 टक्के जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे.  सिंचनासाठी या धरणातून तीन आवर्तने सोडली जाणार आहे.   (वार्ताहर)अनेक वर्षापासून कालव्याचे लिकेज आहे. त्यासाठी वाढीव निधीची आवश्यकता आहे. कालव्याचा भराव करुन लाईनिंगची कामे झाली पाहिजेत. यासाठी पाठपुरावा सुरु आहे. जुलैअखेर पाणी शिल्लक राहिल्यास जलाशय उपशासाठी परवानगी दिली जाईल. सिंचनासाठी तीन आवर्तने  दिली जाणार आहेत. - सुभाष मोरे,शाखा अभियंता, हिवरा मध्यम प्रकल्पकॅनाल गळतीचा फटका रहिवाशांनाही..हिवरा मध्यम प्रकल्पाच्या कॅनाल गळतीमुळे मोठय़ा प्रमाणावर रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरत असल्याने घराच्या भिंती पडण्याच्या मार्गावर आहे तर काही जीर्णावस्थेत आल्या आहेत. हा त्रास अनेक दिवसापासून होत आहे. शिवाय आजाराचे प्रमाणही वाढले आहे.  गावाला पाणीपुरवठा करणा:या विहिरीत देखील हे दूषित पाणी जात आहे. त्यामुळ साथीचे आजारही वाढले आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरुन चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.