शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ाच्या पायथ्याशी पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: May 14, 2017 13:19 IST

थंड पाण्यासाठी भर उन्हात त्यांना दीड ते दोन किलोमीटर्पयत पायपीट करावी लागत आहे.

ऑनलाइन लोकमतअडावद, जि. जळगाव, दि. 13 - सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या उनपदेव येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी फरफट सुरू आहे. हातपंपातून पिण्यासाठी चक्क गरम पाणी मिळत आहे. थंड पाण्यासाठी भर उन्हात त्यांना दीड ते दोन किलोमीटर्पयत पायपीट करावी लागत आहे.अडावदपासून साडे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उनपदेव येथील शरभंगऋषीनगर व उनपदेव गेट जवळील वस्तीत सुमारे 125 ते 150 आदिवासी कुंटुबे वास्तव्यास आहे. अडावद ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येथील वस्तीची लोकसंख्या  450 ते 500 च्या जवळपास आहे. येथे अंगणवाडी, जि.प. प्राथमिक शाळा आहे. विजेच्या तोकडय़ा सुविधेसह पाण्यासाठी एक हातपंप आहे. परंतु या हातपंपातूनही  मोठय़ा जिकरीने पाणी येते, तेही गरम. पिण्याच्या पाण्याचे एकमेव  साधन म्हणून हातपंपच आहे.  हाताच्या ओंजळीत  घेता येणार नाही एवढे गरम पाणी या हातपंपातून येत असते.  त्यामुळे गरम पाणी थंड करून काही वेळाने प्यायला मिळते. रखरखत्या ऊन्हामुळे पाण्याची पातळी खोल जात असल्याने या हातपंपाचे पाणी केव्हाही अचानक बंद पडते. त्यामुळे पाणी सुरू असताना सर्वाची पाण्यासाठी एकच धावपळ सुरु असते. थंड पाण्यासाठी भर उन्हात येथील महिला पुरूषांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील शेतातील  कुपनलिकेवर जाऊन थंड पाणी आणावे लागते. त्यातही  वीजपुरवठा खंडीत झालेला असल्यास मोठी अडचण होत असते. असे असले तरी आदिवासी बांधवांच्या या गंभीर प्रश्नाकडे कुणीही लक्ष देत नसल्याने त्यांची मोठी फरपट होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.  ग्रामपंचायत, जिल्हा परिषदसह लोकप्रतिनिधींनी तात्काळ आदिवासी बांधवांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे.