शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वाकोदकरांच्या माणुसकी धर्माचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 18:51 IST

जोशी कुटुंबाला दशक्रिया विधीसाठी मदत

ठळक मुद्देजोशी कुटुंबाला दशक्रिया विधीसाठी केली मदतवाकोदकरांनी केले 11 हजारांचे निधी संकलनमदतीमुळे विद्या जोशी यांना मिळाला धीर

ऑनलाईन लोकमत वाकोद ता. जामनेर,दि.9 - अत्यंत गरीब कुटुंबातील व वाकोदसह परिसरातील भटजी व ज्योतिष काम करीत असलेले संजय वसंत जोशी यांच्या दशक्रिया विधीसाठी संपूर्ण गावाने आर्थिक मदत करीत माणुसकी धर्माचा जागर केला. संजय जोशी यांचे 29 जुलै रोजी आजाराने निधन झाले होते. रीतीरीवाजानुसार भुसावळ येथे तापी नदीवर जावून अंत्यविधीच्या पश्चात करण्यात येणा:या धार्मिक संस्कारांची रीत असल्याने व घरची परिस्थिती पाहता गरिबीची असल्याने संजय जोशी यांची प}ी विद्या यांच्यासमोरे मोठे संकट निर्माण झाले होते. मात्र त्यांच्यावरील संकट पाहता वाकोद येथील काही सुज्ञ नागरिक जोशी कुटुंबियांच्या मदतीसाठी सरसवाले व वाकोद गावातून वर्गणी जमा करुन सुमारे रोख 11 हजार रुपयांची आर्थिक मदत या कुटुंबाला करुन पवित्र कार्य केले. आधीच पतीचा एकमेव आधार असलेल्या विद्या जोशी यांच्यावर मोठे संकट होते. एक मुलगी असून तिचे लग्न झालेले आहे तर एक मुलगा असून तोही लहान असल्याने कमाईचे कोणतेच साधन नसल्याने उत्तरकार्याचे कसे होईल ही चिंता त्यांना सतावत होती. त्यातच ग्रामस्थांनी मदतीचा हात दिल्याने विद्या जोशी यांना मोठा धीर मिळाला. डॉ. शंकर चौधरी, भगवान आस्कर, संजय खराट, रमेश कुमावत, नंदू जोशी यांनी गावात फिरून पैसे जमा करून एकूण 11 हजार रुपये रोख रक्कम विद्या जोशी यांना दिली.