शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीसाठी २१ मे रोजीची मतदार यादी धरणार ग्राह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:25 IST

निवडणूक आयोगाचे आदेश

ठळक मुद्दे मतदार संख्येत सुमारे ५ हजारांची वाढ शक्य मतदारसंख्या ३ लाख ६२ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाजतर ३६१३ मतदार राहणार वंचित

सुशील देवकरजळगाव: मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ मे २०१८ रोजी अस्तित्वात असलेली मतदार संख्या (यादी) ग्राह्य धरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने मनपाला दिले आहेत. त्यामुळे २१ मेच्या आत नोंदविलेली नावे या यादीत समाविष्ट होणार असून मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत जेमतेम ५ हजारांची वाढ होण्याची शक्यता आहे.मतदारसंख्या ३ लाख ६२ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज१. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे १० जानेवारी २०१८ रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार जळगाव शहरात पुरूष मतदार १ लाख ९० हजार ३३०, स्त्री मतदार १ लाख ६८ हजार ६३६ व इतर २५ असे एकूण ३ लाख ५८ हजार ९९१ मतदार आहेत.२. ही यादी प्रसिद्ध झाल्यापासून ४ महिन्यात नवीन मतदारांचे नोंदणीसाठी ५हजार ६६३ अर्ज आले आहेत. तर नाव वगळण्यासाठी ८५५ अर्ज आले आहेत. म्हणजेच यातील किमान ३ हजार मतदारांची नावे मतदार यादीत २१ मे पूर्वी समाविष्ट होतील.३. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत जेमतेम ५ हजार मतदारांची वाढ होऊन ही संख्या ३ लाख ६२ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मागील निवडणुकीच्यावेळी म्हणजेच २०१३ मध्ये मतदार संख्या ३ लाख ५७३३६ इतकी होती.तर ३६१३ मतदार राहणार वंचित१० जानेवारी २०१८ रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून ४ महिन्यात नवीन मतदारांचे नोंदणीसाठी ५६६३ अर्ज आले आहेत.त्यापैकी १०३९ अर्ज राज्यस्तरावरून मंजूर झाले आहेत. मात्र अद्यापही ३६१३ अर्जांवर कार्यवाहीच झालेली नाही. ती प्रक्रिया २१ मेच्या आत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यातही रविवार सुटीचा दिवस वगळता जेमतेम ४ दिवस उरले आहेत. या चार दिवसांत हे ३ हजार ६१३ मतदारांच्या नोंदणीवर निर्णय न झाल्यास त्यांना येत्या मनपा निवडणुकीतील मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे.मनपाच प्रसिद्ध करणार मतदार यादीमनपा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेतर्फे १० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध मतदार यादी मनपाला पुरविली जाईल. तर त्यानंतर २१ मे च्या आत समाविष्ट झालेल्या मतदारांची यादी निवडणूक शाखेच्या मुंबई कार्यालयाकडून मनपाला मिळेल. ती एकत्रित करून प्रभागनिहाय मतदार याद्या मनपाला प्रसिद्ध करून हरकती मागवाव्या लागून त्यानंतर अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मागील वर्षी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार ३७ प्रभागांमध्ये ३ लाख ५७ हजार ३३६ मतदार होते. त्यापैकी ६७ हजार ६७६ मतदार चिन्हांकित म्हणजे संशयाच्या भोवऱ्यात अडकले असल्याचे स्वत: निवडणूक अधिकारी संजय कापडणीस यांनी जाहीर केले होते, या मतदार यादीवर अनेक हरकती घेण्यात आल्या होत्या. त्या वादातच मतदान प्रक्रिया पार पडली होती.