शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वेल्हाणे गावी जागतिक कुटुंब दिनी आजीने घेतली १८३ कुटुंब सदस्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:06 IST

सत्कार सोहळ्याने सर्वच भारावले

आॅनलाईन लोकमतपारोळा, जि.जळगाव : सुमारे ९२ वर्षीय आजीने आपल्या १८३ कुटुंब सदस्यांची भेट घेतली आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम वेल्हाणे, ता.पारोळा या गावी घेण्यात आला.वेल्हाणे येथील गं.भा. यशोदा जुलाल पाटील या आजींचे वय ९२. या आजींना सात मुले, सात सुना आणि सहा मुली, सहा जावई असा मोठा परिवार आहे. त्यांना त्यात ६७ नातवंडे, ७१ पणतू आणि १९ खापर पणतू असे एकूण १८३ सदस्य असलेले कुटुंब आहे. आज जागतिक कुटुंब दिवसानिमित्त हे सर्व १८३ सदस्य एकत्र आले. यात सर्वांनी आपला परिचय करून दिला. आजीची एक नातू आणि नातसून परदेशात होते. त्यांनीदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. या सर्वांना पाहून आजींचा आनंद द्विगुणित झाला. सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत यानिमित्ताने प्रत्येकाने आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला. कोणी नृत्य सादर केले, तर कोणी गाणी म्हटलं, कोणी मिमिक्री सादर करीत कार्यक्रमाचा मनमुरादपणे आनंद लुटला.या वेळी या कार्यक्रमातून सर्वांची एकमेकांची जवळून ओळख झाली वेल्हाणे गावात अशाप्रकारे पहिल्यांदा असा कार्यक्रम झाल्याने गावात एकच चर्चा झाली. ढोली-वेल्हाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. झेड. पाटील आजींचा मुलगे असून, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.डोळ्याचे पारणे फिटलेमी माझ्या कुटुंबातील १८३ सदस्यांना एकत्रितपणे पाहून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. माझ्यासारखी भाग्यवंत मीच आहे. नातू, पणतू, खापर पणतू पाहण्याचा योग मला जागतिक कुटुंब दिनानिमित्ताने मिळाला आहे.-यशोदा पाटील, (वय ९२ वर्षे)सर्व कुटुंब एकत्रित आणण्याचे भाग्य मिळालेजागतिक कुटुंब दिवसाचे औचित्य साधत मला १८३ सदस्य असलेले कुटुंब या माध्यमातून एकत्रितपणे आणता आले. सर्वांच्या विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी झाली. -बी. झेड.पाटील (आजींचे चिरंजीव)