शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षा भोगून आलेल्यास ग्रामस्थांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 12:13 IST

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चहार्डी येथील 25 ते 30 जणांविरूद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाइन लोकमतचोपडा, जि. जळगाव, दि. 16 - खुनाच्या  गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या इसमाला मारहाण करीत  त्याला दोराने बांधून चोपडा शहर पोलीस स्टेशनला आणले. तसेच पोलीस स्टेशनच्या आवारात आरडाओरड करून, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चहार्डी येथील 25 ते 30 जणांविरूद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेला गुलाब हिरालाल धोबी याने 15 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गावात दगडफेक केली.  त्यास ग्रामस्थांनी समजावून सांगितले तरी त्याने ऐकले नाही. म्हणून ग्रामस्थांनी त्यास मारहाण केली व  दोराने बांधून चोपडा शहर पोलीस स्टेशनला आणले.  पोलीस स्टेशनच्या आवारात गर्दी जमवून आरडा ओरड केली.  पोलीस स्टेशनच्या आवारातून गुलाब धोबी यास परस्पर घेऊन जात होते. पोलिसांनी त्यांना अडविले. ग्रामस्थांनी शासकीय कामात अडथडा निर्माण करीत जिल्हाधिका:यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार श्यामराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळशीराम धनगर कोळी, राजेंद्र दुलीचंद चावर, मधुकर नामदेव कोळी, सीताराम वसंत पाटील, गिरीश सुभाष पाटील, नरेंद्र युवराज पाटील, किशोर शांताराम कोळी,   गोपाळ धनराज कोळी, प्रवीण दिलावर पिंजारी, अजरुन देवराम कोळी, पंकज देवराम कोळी, संदीप प्रताप मोरे, किरण विश्वनाथ चौधरी, संदीप दत्तात्रय पाटील, शरद शांताराम कोळी , विजय सुकदेव कोळी, मिलिंद सुभाष शेट, भाईदास सैंदाणे यांच्यासह 25 ते 30 जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला.