शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात माय-लेकी ठरल्या कौटुंबिक कलहाच्या बळी

By admin | Updated: April 18, 2017 13:17 IST

पत्नीने उधारीत साडय़ा आणल्याचा राग आल्याने पती-पत्नीत जोरदार खटके उडाले अन् संतापातच पत्नीने पोटच्या दोन्ही गोळ्यांसह आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल़े

 भुसावळ,दि.18- पत्नीने उधारीत साडय़ा आणल्याचा राग आल्याने पती-पत्नीत जोरदार खटके उडाले अन् संतापातच पत्नीने पोटच्या दोन्ही गोळ्यांसह आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल़े दैव बलवत्तर म्हणून साडेतीन वर्षाची चिमुरडी बचावली मात्र दोन्ही माय-लेकी कौटुंबिक कलहाच्या बळी ठरल्या़

शहरातील जळगाव रोडवरील भिरूड कॉलनीत गवळे कुटुंब वास्तव्यास आहेत़ लक्ष्मण सुरेश गवळे  हे वरच्या मजल्यावर तर लहान बंधू राजेंद्र गवळे हे खालच्या मजल्यावर राहतात़ लक्ष्मण गवळे यांचे पत्नी मनीषाशी रविवारी सकाळी उधारीत आणलेल्या साडय़ांवरून घरात कौटुंबिक वाद झाला अन् पत्नीने टोकाचे पाऊल उचलत दोन्ही मुलींसह रेल्वेखाली झोकून दिल़े रविवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असलीतरी रात्री 12 वाजेच्या सुमारास ती उघडकीस आली़ 
तिसरी मुलगी बचावली
गवंडी काम करणा:या लक्ष्मण गवळे यांना दिव्या (18), पायल (15) व प्राची (3़5) अशा तीन मुली आहेत़ दोन नंबरची मुलगी पायल (15) ही आत्याकडे काही दिवसांपूर्वीच नागपूर येथे गेल्याने कालच्या दुर्दैवी घटनेतून ती बचावली़ 
आडगावात शोककळा
आदर्श गाव आडगाव (ता़चोपडा) येथील मयत मनीषा गवळे यांचे माहेर तर एकनाथ नारायण सूर्यवंशी यांच्या त्या धाकटय़ा कन्या़ सूर्यवंशी यांना तीन कन्या आहेत़ त्यातील थोरली अक्का, दोन नंबरची राधा व धाकटी मनीषाचा साधारण 22 वर्षापूर्वी लक्ष्मण गवळे यांच्याशी विवाह झाला होता़ माय-लेकींनी रेल्वेखाली झोकून केलेल्या आत्महत्येनंतर आडगावातही शोककळा पसरली़ 
एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा
रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या मनीषा गवळे व दिव्या गवळे यांच्या  मृतदेहावर जळगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी भिरूड कॉलनीतील निवासस्थानी आणण्यात आला़ एकाचवेळी माय-लेकींच्या निघालेल्या अंत्ययात्रा पाहून उपस्थित नातेवाईकांसह कॉलनी भागातील महिलांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होत़े