शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

वरणगाव न.प. याद्यांमध्ये प्रचंड घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 16:18 IST

याद्यांमधील दुरुस्त्या न केल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने पाठपुरावा करेल, असा इशारा देण्यात आला.

 वरणगाव : येथील नगरपरिषदेच्या निवडणूक याद्यांवर आक्षेप व हरकती घेण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. त्यावर अक्षरश: तक्रारीचा व आक्षेपांचा जणू काही पाऊसच पडला. त्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ नगरपरिषदेत  जाऊन धडकले आणि  लेखी स्वरुपात पुराव्यांसह  हरकती आणि तक्रारी दाखल करण्यात आल्या. यापूर्वीच १३४९ हरकती दाखल झालेल्या होत्या आणि आज सुमारे एक हजारच्या आसपास तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींचे निरसन करून याद्या अद्ययावत न केल्यास वेळप्रसंगी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख समाधान महाजन व सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यवंशी व इतर अधिकाऱ्यांना दिला.१५ फेब्रुवारी २०१९ रोजी नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर नावे त्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. मतदार प्रत्यक्षात ज्या ठिकाणी राहात आहे तिथेच त्याचे नाव नोंदणी अपेक्षित आहे परंतु असे न करता त्यांची नोंदणी इतर प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. काही मतदार वरणगाव शहरात राहत नसूनदेखील बनावट आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे राजकीय हेतूने नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकारण्यांनी याद्यांमध्ये प्रचंड घोळ निर्माण केला आहे. या याद्या नियमाप्रमाणे बिनचूक करून लोकशाही मार्गाने निवडणुका पार पाडाव्यात, अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.याद्यांमधील दुरुस्त्या न केल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने पाठपुरावा करेल, असा इशारा देण्यात आला. या शिष्टमंडळात रावेर लोकसभा मतदारसंघाचे उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, निळू सरोदे, सुभाष चौधरी, सईद मुल्ला, सागर वंजारी, राहुल बावणे, सुरेश चौधरी आदी उपस्थित होते.                                         दरम्यान, दुसरीकडे उपनगराध्यक्ष शेख अखलाक यांच्या वार्डातसुध्दा अनोळखी नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याने त्यांनीसुध्दा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ