शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वरगव्हाणला 50 जणांना अतिसाराची लागण

By admin | Updated: May 28, 2017 12:32 IST

वैद्यकीय पथक दाखल : पाण्याचे नमुने घेतले

ऑनलाईन लोकमत

बिडगाव, जि.जळगाव,दि.28- दूषित  पाणी पुरवठय़ामुळे वरगव्हाण (ता.चोपडा) येथील जवळपास 50 ते 60 जणांना अतिसाराची लागण झालेली आहे. रूग्णांवर जिल्हा परिषदेच्या शाळेत तातडीने उपचार सुरू आहे. या गावाला गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिका:यांनी रविवारी सकाळी भेट देवून परिस्थितीची पहाणी केली.
वरगव्हाण येथे दूषित पाणी पुरवठय़ामुळे शनिवारपासूनच काहींना उलटय़ा व संडासचा त्रास होऊ लागला होता. गावात अतिसाराची लागण झाल्याचे धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविण्यात आले. त्यानुसार आरोग्यसेवक जे.वाय.पाटील बी.एस. सोनवणे व भिकुबाई बोदळे हे हजर होवून त्यांनी मध्यरात्री दीड वाजेर्पयत ग्रामपंचायत कार्यालयातच रूग्णांवर उपचार केले.
दरम्यान, गावात अतिसाराची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढतच आहे. चार वैद्यकीय अधिका:यांचे पथक गावात दाखल झाले असून, त्यांनी रूग्णांवर उपचार सुरू केले आहे. या रूग्णांना जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत   सलाईन लावण्यात आलेल्या आहेत. 
जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती दिलीप पाटील हे वरगव्हाणलाच थांबून आहेत. तर रविवारी सकाळी गटविकास अधिकारी ए.जे.तडवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश लोमटे यांनीही भेट देत रूग्णांची पहाणी केली. दरम्यान पाण्याचे नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लोमटे यांनी दिली.