शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘वंदे मातरम्’ साठी 22 वर्षापूर्वी जळगावातून लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:12 IST

आठवणींना उजाळा : शिक्षकाचा पुढाकार

ठळक मुद्देशाळा आणि महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ सुरु करण्याचे आदेशमातृभूमीची महती सांगणारे राष्ट्रभक्ती निर्माण करणारे ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताबद्दल प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा

ऑनलाईन लोकमत / चुडामण बोरसे  

जळगाव, दि. 7 -  गेल्याच आठवडय़ात ‘वंदे मातरम्’ वरुन राज्यात  मोठाच गदारोळ झाला होता. शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’  सक्तीचे करण्यात यावे, यासाठी जळगाव जिल्ह्यातील संजय चौधरी या  शिक्षकाने 22 वर्षापूर्वी न्यायालयीन लढा दिला होता. त्यामुळे या आठवणींना उजाळा मिळाला आहे.   एरंडोल तालुक्यातील कासोदा  येथील संजय आत्माराम चौधरी असे या शिक्षकाचे नाव. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधून ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करावे,  यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विनंती अर्ज (क्र.93/95) 26 जून 1995 केला होता.   त्यावर  खंडपीठाचे तत्कालीन अतिरिक्त रजिस्टार  जी.डी. पारेख यांनी न्यायालयाच्या अधीन राहून शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याचे आदेश 14 ऑगस्ट  1995 रोजी दिले होते. आजमितीस यास 22 वर्षे पूर्ण होत आहेत. यानंतर राज्याच्या तत्कालीन शिक्षण संचालकांनी 24 नोव्हेंबर 1995 रोजी शाळा आणि महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ सुरु करण्याचे आदेश बजावले होते. या आदेशानंतर जिल्हा परिषदेतील शिक्षण  समितीचे तत्कालीन सभापती पी.सी.पाटील यांनी ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याचे आदेश मे 2005 मध्ये दिले होते. मुलांमध्ये लहानपणापासून देशभक्ती अंगी बाणावी आणि मातृभूमीची महती सांगणारे राष्ट्रभक्ती निर्माण करणारे ‘वंदे मातरम्’ सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नियमित म्हटले जावे, यासाठी आपण 22 वर्षापूर्वी हा लढा दिला होता, राष्ट्रगीताबद्दल प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा. आणि तो वेळोवेळी व्यक्त व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.  

अशी सुचली कल्पनाआकाशवाणीवर  रोज पहाटे दिवसाची सुरुवात ही ‘वंदे मातरम्’ या गीताने होत असते. मग शाळांमधून हे गीत का म्हटले जाऊ नये, असा विचार मनात आला. यासाठी आपण उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र या आदेशाची अंमलबजावणी मात्र होत नाही. 15 ऑगस्ट 2017 पासून शाळा व महाविद्यालयात ‘वंदे मातरम’ सक्तीचे करावे.      - संजय आत्माराम चौधरी