शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

लस आली आणि संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:18 IST

जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने कधी सुरू तर कधी बंद, अशा अवस्थेत ...

जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने कधी सुरू तर कधी बंद, अशा अवस्थेत राबवली जात आहे. दोन दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्र डोस नसल्यामुळे बंद होते. तिसऱ्या दिवशी दहा केंद्र सुरू झाले. मात्र, पुन्हा लसीचा तुटवडा झाल्यामुळे यातील सात केंद्र बंद झाले असून, शुक्रवारी शहरातील केवळ तीन केंद्रांवर लसीकरण होणार आहे. दरम्यान, कोविशिल्ड लसीचे १६००० डोस शनिवारपर्यंत केंद्रांना प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शहरातील स्वाध्याय भवन आणि कांताई नेत्रालय या केंद्रांवर कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जात असल्याने या केंद्रांवर काही प्रमाणात गर्दी होती. मात्र, या केंद्रांवरील कोवॅक्सिन लसीचे डोस संपल्याने ही केंद्रे शुक्रवारी बंद राहणार आहेत. गुरुवारी अन्य सर्व केंद्रांवर कोविशिल्ड लसीचे ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी दुसरा डोस प्राधान्य व पहिला डोस अशाप्रकारे केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

शुक्रवारी छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, डी. बी. जैन रुग्णालय आणि शाहीर अमर शेख हॉस्पिटल या ठिकाणीच लसीकरण सुरू राहणार आहे, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम रावलानी यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाचे रोटरी भवन आणि रेड क्रॉस सोसायटी केंद्रात ही लस उपलब्ध नसल्याने बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तीन खासगी केंद्रांना परवानगी

खासगी केंद्रांना थेट कंपन्यांशी संपर्क करून लस विकत घेता येणार असून, अशा ३१ केंद्रांना गेल्या आठवड्यात प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यात आणखी तीन केंद्रे वाढविण्यात आली असून, या केंद्रांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. या तीन नवीन केंद्रांमध्ये डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच अन्य दोन केंद्रांचा समावेश आहे.