शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गावपुढाऱ्यांचे चक्क बिअरबार पुढे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या लसीकरणासाठी नागरिक तासन् तास रांगेत उभे राहात आहेत. मात्र, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या लसीकरणासाठी नागरिक तासन् तास रांगेत उभे राहात आहेत. मात्र, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकीकडे लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा असताना, दुसरीकडे आरोग्य केंद्रावरून काही कर्मचारी लसी घेऊन कानळदाबाहेरील एका बिअरबारच्या परिसरात इतर गावांमध्ये गाव पुढाऱ्यांच्या नातेवाईकांना लसीकरण करत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी मोठा गोंधळ केला. हा वाद वाढत असल्याने याठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी करून वाद शांत केला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. जळगाव शहरासह तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही लसीकरणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. सुरुवातीला लसीबाबत नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम होता. मात्र, आता ते दूर झाल्याने नागरिक स्वतःहून लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. जळगाव तालुक्यातील कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. दररोज प्राथमिक आरोग्य केंद्राला ११० डोस दिले जात आहेत. मात्र, याठिकाणी दररोज तीनशेहून अधिक नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. शुक्रवारीही सकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याने अनेकांचे हालदेखील याठिकाणी होत आहेत.

बिअरबारसमोर लसीकरण आणि निर्माण झाला वाद

प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागलेल्या असताना, कानळद्यात गावाबाहेर असलेल्या एका बिअरबारजवळ भोकर गावातील एका पुढाऱ्याच्या कुटुंबियांना लस दिली जात असल्याची माहिती गावातील काही युवकांना मिळाली. त्यानुसार युवकांनी बिअरबारच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही कर्मचारीदेखील त्याठिकाणी आढळले. यामुळे संतप्त नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर चांगलाच गोंधळ घातला. तसेच गाव पुढाऱ्यांना लपून-छपून लसीकरण केले जात असल्याचाही आरोप नागरिकांनी यावेळी केला. नागरिकांचा गोंधळ वाढत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी झालेल्या गोंधळाबाबत तालुका पोलीस स्थानकाला माहिती दिल्यानंतर याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

वेळेवर पकडल्याने थांबवले लसीकरण

नांदगाव येथील काही तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, बिअरबारसमोर काहीजणांना लसीकरण देण्याआधीच युवकांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढून आरोग्य केंद्र गाठले. याठिकाणी एका व्यक्तीला लसीकरण करण्यात आले, असा दावा युवकांनी केला आहे. इतरांनाही लसीकरण करण्यात येणार होते मात्र त्याआधीच त्याठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याने इतरांना लसीकरण करता आले नाही, अशीही माहिती नागरिकांनी दिली. दरम्यान, हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला असला, तरी याआधीही याठिकाणी असे प्रकार घडत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक नागरिकांना चार-चार दिवस रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही. मात्र, दुसरीकडे वशिला लावून गाव पुढार्‍यांना लसीकरण केले जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. कानळदा परिसरातील इतर गावांमधील अनेक गाव पुढाऱ्यांना वशिल्याने लसीकरण करण्यात आल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, वाद वाढत असल्याने पोलिसांनी याठिकाणी मध्यस्थी करून वाद शांत केला. या वादामुळे काहीकाळ लसीकरणाची प्रक्रियादेखील बंद पडली होती.

कोट..

काही नागरिकांच्या गैरसमजातून हा प्रकार घडला. संबंधित आरोग्य विभागातील कर्मचारी हे किनोद या गावाला जात होते. त्यात काही नागरिकांनी विचारपूस करण्यासाठी त्यांना त्याठिकाणी थांबवले होते. मात्र, काही नागरिकांनी याबाबत गैर अर्थ काढल्याने हा वाद निर्माण झाला. मात्र, असा कोणताही प्रकार याठिकाणी घडलेला नाही.

- एम. एन. पेशेट्टिवार, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कानळदा