शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात लसीकरणाचा दर घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

सात दिवसांत १५ तालुक्यांत फक्त ४५,८७३ जणांना लस लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचा ...

सात दिवसांत १५ तालुक्यांत फक्त ४५,८७३ जणांना लस

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचा दर मंदावला आहे. सात दिवसांत १५ तालुक्यांत मिळून ४५ हजार ८७३ जणांनाच लस मिळाली आहे. त्यातही दुसऱ्या डोसचे प्रमाण जास्त आहे. नव्याने लस घेण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे किंवा खासगी केंद्रांवर जाऊन लस घ्यावी लागत आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दर चांगलाच घसरला आहे. जिल्ह्यातील लसीकरणासाठी पात्र असलेली लोकसंख्या ही जवळपास ३५ लाख आहे. सध्या २१ जुलैपर्यंत सकाळी प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ९ लाख २० हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे, तर मागील गुरुवारी ८ लाख ७४ हजार नागरिकांचे लसीकरण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक लस मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सरकारी केंद्रांवर लस कमी, तर खासगी केंद्रांवर लस उपलब्ध

जिल्हा प्रशासनाने मंगळवारी रात्री दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील सरकारी लसीकरण केंद्रांवर १३१० कोविशिल्ड आणि ७३० कोव्हॅक्सिन उपलब्ध होते. जळगाव शहरात महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर मिळून ३५० डोस होते, तर फक्त दोनच खासगी केंद्रांवर २२० कोविशिल्ड आणि ९५० कोव्हॅक्सिन उपलब्ध होते. त्यामुळे खासगी केंद्रांवर सरकारी केंद्रांच्या प्रमाणात लस जास्त उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.

कोट : सध्या शासनाकडे उपलब्ध असलेल्या लसीच्या डोसनुसार जिल्ह्याला लोकसंख्येच्या प्रमाणात लस मिळत आहे. त्यातही अनेकांचे दुसरे डोस बाकी आहेत. त्यामुळे दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. - अभिजित राऊत, जिल्हाधिकारी

एकूण लसीकरण

२१ जुलै - ९२०५६९

२० जुलै- ९१८९६८

१९ जुलै - ९१०३१८

१८ जुलै - ९०४६८५

१७ जुलै - ८९८७११

१६ जुलै - ८७६६६४

१५ जुलै - ८७४६९६