शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पालिका प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 15:57 IST

नगरपालिका प्रशासनाविरोधात तहसील कचेरी येथे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशहर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे असाही फंडा तहसील कचेरी येथे प्रतिकात्मक आंदोलन

चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नगरपालिका प्रशासनाविरोधात तहसील कचेरी येथे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून शहरातील रस्त्यावर चालणे मुश्कील झाले आहे म्हणून गटनेते राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व शहर विकास आघाडीतर्फे रविवारी प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांभोवती रांगोळी काढून झाडे लावण्यात आली व शहरातून रॅली काढण्यात आली.खरजई नाका ते दयानंद हॉटेलपर्यंत गेल्या वर्षी रस्ता करण्यात आला होता परंतु एकाच वर्षात रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. सिग्नल पॉईंट ते कचेरीपर्यंतसुद्धा चालणे अवघड झाले आहे. यारस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहे. याबाबत नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. गेली चार वर्ष शहरातील नागरीक व व्यापारी हे सहन करीत आहेत. फक्त कागदावरच नगरपालिकेचा कारभार पाहावयास मिळतो आहे, आता तरी प्रशासनाला जाग येईल का? चाळीसगाव शहरातील रस्ते हे अतिशय खड्डेमय झालेले असताना सामान्य जनतेला मणक्याचे व पाठीचे त्रास चालू झाले असून महिलांना तर वाहने चालवणे अतीशय कठीण झाले आहे. सिग्नल चौकपासून ते घाट रोड जाण्यासाठी अर्धा तास लागतोय. खड्ड्यांमुळे कायम ट्रॅफिक जाम असते. गणेश रोड, कॅप्टन कॉर्नर कचेरी अंधशाळा ते कचेरी ह्या रस्त्यावर चालणे अवघड झाले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस व लोकनेते अनिलदादा देशमुख शहरविकास आघाडीतर्फे खड्ड्यांभोवती रांगोळी काढून झाडे लावण्यात आली व कचेरी ते सिग्नल व गणेश रोडवर रॅली काढण्यात आली.यावेळी जि.प. गटनेते शशिकांत साळुंखे, दूधसंघाचे संचालक प्रमोद पाटील, रा.काँ.तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष सोनल साळुंखे, शहराध्यक्ष श्याम देशमुख, नगरसेवक भगवान पाटील, पं.स. सभापती अजय पाटील, मंगेश पाटील, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, सदाशिव गवळी, जगदीश चौधरी, रवींद्र गिरधर चौधरी, प्रदीप राजपूत, प्रशांत पाटील, शेखर देशमुख, हरी जाधव, बाजीराव दौंड, परिघा आव्हाड, हेमांगी शर्मा, स्नेहल देशमुख, आर.के. माळी, खुशाल पाटील, भय्यासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रकाश पाटील, योगेश पाटील, मिलिंद शेलार, विजय शितोळे, जिल्हा प्रवक्ते आकाश पाटील, मोहित भोसले तालुकाध्यक्ष रा.यु.काँग्रेस, शुभम पवार शहराध्यक्ष रा.यु.काँग्रेस, गौरव पाटील शहराध्यक्ष रा.वि. काँग्रेस, सुजित पाटील, विलास पाटील, राकेश राखुंडे, आव्हाड , दिनेश महाजन, भय्यासाहेब महाजन, सौरभ त्रिभुवन, रिकी सोनार, गुंजन मोटे, शरदसिंग राजपूत, विनोद गवळी, कौस्तुभ राजपूत, पंजाबराव देशमुख, रफिक शेख, सुरज शर्मा, दीपक शिंदे, कुंतेश पाटील, प्रतीक पाटील, विकास बोंडारे, निखिल देशमुख, पप्पू राजपूत, मंगेश वाबळे, कुलदीप निकम, हृदय देशमुख, अतुल चौधरी, शुभम गवळे, घनश्याम जगताप, सिद्धार्थ देशमुख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षChalisgaonचाळीसगाव