शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दागिने पॉलिशच्या बहाण्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

रावेर : पोलिसांनी पाठलाग करून पकडले लोकमत न्यूज नेटवर्क रावेर : चांदीच्या दागिन्यांचे पॉलिश करून चमकवून देण्याच्या ...

रावेर : पोलिसांनी पाठलाग करून पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेर : चांदीच्या दागिन्यांचे पॉलिश करून चमकवून देण्याच्या बहाण्याने ११ हजार रुपयांची चांदी घेऊन पसार झालेल्या दोन जणांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ही घटना सातपुड्याच्या दुर्गम भागात ताडजिन्सी व विश्राम जिन्सी गावात मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली.

करणकुमार सुबोधप्रसाद साह व राजकुमार प्रदीप साह भागलपूर (दोघे रा. भागलपूर, बिहार) अशी या अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. ताडजिन्सी गावातील शरीफ रज्जाक तडवी यांनी या दोघांकडे २५ भार वजनाच्या चांदीच्या तोरड्यांना पॉलिश करण्यासाठी दिले. त्यावेळी हातचलाखी करून त्यातून चार हजार रुपये किमतीची चांदी लांबवली. दरम्यान, रमजान सुल्तान तडवी व जुम्मा तडवी यांना असाच अनुभव आला.

ही बाब दागिने मालकांच्या ध्यानात येताच त्यांनी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पो.कॉ.

उमेश नरवाडे व सचिन गायकवाड यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले. त्यावेळी आरोपी विश्रामजिन्सी गावातून गारबर्डी गावाकडे येत होते. पोलिसांनी पाठलाग करून या भामट्यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी शरीफ रज्जाक तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांकडील मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.

न्या.ए. एच. बाजड यांनी आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास हेकॉ. राजेंद्र राठोड, नरेंद्र बाविस्कर तपास करीत आहेत.