शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

लूटमारीच्या गुन्ह्यात आणखी दोघे ताब्यात

By admin | Updated: March 18, 2017 00:35 IST

दोघांना कोठडी : आरोपींची संख्या झाली सहा

जळगाव : रेल्वेत प्रवाशांशी दादागिरी करुन त्यांच्याजवळील मोबाईल व रोकड लुटणाºया सुरतच्या टोळीतील फरार असलेल्या दोघांनी शुक्रवारी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, दोघंही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना बालनिरीक्षणगृहात दाखल केले आहे. अटकेतील दोघांना न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरत-भसावळ या पॅसेंजरमध्ये सहा जणांच्या टोळीने अमळनेरच्या प्रवाशांना मारहाण करुन मोबाईल हिसकावला होता. त्यातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर दोन जण फरार झाले होते. शेख कदीर शेख इब्राहीम (वय २०) वसीम शेख अजीज (वय २१) या दोघांना अटक करण्यात आली होती व  दोन अल्पवयीन मुलांना बालनिरीक्षण गृहात दाखल करण्यात आले होते. अटकेतील दोघांना शुक्रवारी पोलिसांनी न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विविध साहित्य जप्तसरकारतर्फे अ‍ॅड.आशा शर्मा यांनी काम पाहिले. या टोळीकडून मिरची पूड, चाकू, दोर तसेच एक सीम कार्ड नसलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. शहरात टेहळणी करुन जबरी चोरी किंवा दरोडा टाकण्याचे नियोजन होते, असे चौकशीत निष्पन्न झाल्याचे सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले. दरम्यान, यातील शेख कदीर याच्याविरुध्द सुरत येथे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. अल्पवयीन  मुलांचा वापर करुन गुन्हा करण्याचे नियोजन कदीर व वसीम यांनी केले होते.