शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चोरीप्रकरणी आणखी दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

जळगाव : उसनवारीची रक्कम फेडण्यासाठी चालवायला दिलेला ट्रक परस्पर विक्री केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. ...

जळगाव : उसनवारीची रक्कम फेडण्यासाठी चालवायला दिलेला ट्रक परस्पर विक्री केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. दीपक उर्फ भय्या अरुण पाटील (४०, रा. चोपडा) व मुकेश शांताराम चौधरी (३२, रा. धरणगाव) अशी संशयितांची नावे आहेत.

कैलास सोनू चव्हाण हे धानवड येथील रहिवासी असून, ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील वर्षी त्यांनी नीलेश परदेशी (रा.आसोदा) याच्याकडून उसनवारीने २० हजार रुपये घेतले होते. परंतु, लॉकडाऊनमुळे ती रक्कम ते फेडू शकले नाही. ती रक्कम काही दिवसांत देईल, असे चव्हाण यांनी सांगितल्यानंतर परदेशी यांनी एक ते दोन महिन्यांसाठी तुझा ट्रक मला चालविण्यासाठी दे, मी त्यातून भाडे वसूल करून २० हजार कमवून घेईल व तुझा ट्रक परत करेल, असे सांगितले. त्यानुसार परदेशी याला मालट्रक दिला. त्याने तो परस्पर विक्री केला. अखेर ही बाब लक्षात येताच चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बुधवारी एकाला, तर गुरुवारी दोघांना अटक

मंगळवार, १३ जुलै रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर बुधवारी नीलेश परदेशी हा पोलिसांना गवसला. त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीत नीलेश यांची कसून चौकशी केली असता, त्याने ट्रक दीपक पाटील व महेश चौधरी यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार गुरुवारी चोपडा व धरणगावातून दोघांना अटक केली. तसेच ट्रकची विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

शुक्रवारी नीलेश परदेशी याची पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यामुळे शुक्रवारी नीलेश, दीपक व मुकेश तिघांना न्या. ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल वंजारी, इमरान सय्यद, मुदस्सर काझी, योगेश बारी, सचिन पाटील आदींनी केली आहे.