शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सावद्याजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले

By admin | Updated: May 4, 2017 15:43 IST

रेल्वे वाहतूक सुरळीत : अनेक गाडय़ांना झाला विलंब

 ऑनलाईन लोकमत विशेष /पंढरीनाथ गवळी  

भुसावळ, दि.5- मध्य प्रदेशातील इटारसीकडून येणारी बीसीएन/एचएल या मालगाडीचे (रिकामे) दोन डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातामुळे मध्य रेल्वेची  या मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतूक विस्कळीत झाली होती.  डबे रुळावरुन घसरण्याची घटना गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास भुसावळ विभागातील सावदा रेल्वेस्थानकातील अप लाईनवर घडली. या घटनेमुळे अप मार्गावरील मुंबईकडे जाणा:या मेल/एक्स्प्रेस गाडय़ांना अनेक तास उशीर झाला. दरम्यान, पहाटे 4.30 अपघातग्रस्त डबे रुळावरुन रात्रीच युद्ध पातळीवर  काम करुन रात्रीच उचलण्यात आले आहेत. गुरुवारी पहाटे 4.30 वाजता अप मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
मालगाडीचे डबे घसरल्याची माहिती मिळताच भुसावळ येथून तातडीने एसीआर गाडी (अॅक्सीडेंट रिलिफ ट्रेन)  अपघात स्थळी रवाना झाली. संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी थांबून होते. डीआरएम आर.के.यादव, एडीआरएम अरुण धार्मिक, सिनिअर डीसीएम सुनील मिश्रा आदी अधिकारी  डीआरएम कार्यालयातील नियंत्रण कक्षात लक्ष ठेवून होते. पहाटे 4.30 वाजता वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
या गाडय़ांना झाला विलंब
दिल्लीकडून येणारी (अप मार्गावरील) 12630 स्वर्ण जयंती एक्स्प्रेस, 12618 मंगला एक्स्प्रेस, 13201 जनता एक्स्प्रेस, 12321 हावडा मेल व्हाया अलाहाबाद, 12187 गरीब रथ 15101 जनसाधारण एक्स्प्रेस या गाडय़ांना  चार-ते पाच तास विलंब झाला. त्याउशीराने धावत आहेत. पहाटे अडीच वाजता जाणारी गरीब रथ सकाळी 7.7 वाजता येथून रवाना झाली.