शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

केटी वेअरमध्ये पडून दोघा भावांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 18:12 IST

शिंदाडची घटना : मृत तरुण सिल्लोड येथील रहिवासी

शिंदाड ता पाचोरा - गावाजवळ असलेल्या केटी वेअरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या २ सख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य एक तरुण बचावला. मयत दोघेही तरुण हे सिल्लोड येथील रहिवासी होते. ते येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आले होते.या दुर्घटनेबाबत माहिती अशी की ,शिंदाड येथे रवींद्र लक्ष्मण सोनवणे यांच्याकडे मोहरम निमित्त उरुसचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त सर्व नातेवाईक जमा झाले होते. सोनवणे हे मयत तरुणांचे चुलत मामा होते. हे दोघे तरुण या कार्यक्रमासाठी येथे आले होते. यादरम्यान ते दोघे व आणखी एक तरुण असे तिघे जण कुटुंबात कुणालाही न सांगत शिंदाड गावजवाळ असलेल्या केटी वेअर मध्ये पोहण्यासाठी गेले मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने संदीप तात्याराव चव्हाण (वय २०) व निलेश अंबादास चव्हाण (वय १८) हे दोखे सख्खे चुलत भाऊ बुडून मृत पावले. तर अमर तात्याराव चव्हाण याला गावातील एका गुराख्याने वाचवले. पाण्यात दोघे तरुण बुडल्याची वार्ता पसरताच गावातील तरुण जमा झाले व पाण्यात उडी मारुन शोध घेतला. सुमारे अर्ध्या तासाने या दोघांचे शव आढळले.याबाबत उषाबाई राजू सोनवणे यांचे खबरीवरुन पिंपळगाव हरे.पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.