शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चलन तुटवड्यामुळे सेंट्रल बँकेच्या चार शाखा बंद

By admin | Updated: December 26, 2016 23:07 IST

५०० व १ हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर चलन तुटवड्यामुळे सर्वच जण बेजार आहेत. खातेदारांना पुरेशी रक्कम देता येत नसल्याने

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 26 -  ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर चलन तुटवड्यामुळे सर्वच जण बेजार आहेत. खातेदारांना पुरेशी रक्कम देता येत नसल्याने सोमवारी सेंट्रल बँकेच्या रावेर तालुक्यातील खानापूर सह ४ शाखा बंद ठेवण्यात आल्या. चलन टंचाईमुळे ग्रामीण भागात सर्वाधिक हालपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसात स्थिती सुधारून व्यवहार सुरळीत होतील असे आश्वासन दिले होते. मात्र आजही पुरेसे चलन उपलब्ध होत नसल्याने बँकांची अडचण होत आहे. त्याचा फटका ग्रामीण भागाला सर्वाधिक बसत आहे. ग्रामीण भागात जिल्हा बँकांमध्ये खातेदारांना रक्कम मिळत नाही. आता सेंट्रल बँकेला देखील त्याचा फटका बसत आहे. पुरेशी रक्कम नसल्याने सोमवारी सेंट्रल बँकेने आपल्या चार शाखा बंद ठेवल्या. त्या आशयाची माहिती शाखा व्यवस्थापकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली आहे.एटीएम मशिन बंदचजिल्हाभरात राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम मशिन आहेत. सद्यस्थितीला स्टेट बँक आॅफ इंडिया, अ‍ॅक्सीस बँक, एचडीएफसी बँक वगळता अन्य बँकांचे एटीएम बंद आहेत. सेंट्रल बँक, बँक आॅफ महाराष्ट्र व बँक आॅफ इंडियासह अन्य बँकांचे एटीएम पहिल्या दिवसांपासून बंद आहेत.धनादेशाचे व्यवहार दुप्पटीने वाढलेचलन तुटवड्यामुळे व्यवहार ठप्प झाले असताना कॅशलेस व्यवहार वाढत आहे. सध्या बँकांमध्ये धनादेशाद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारांची संख्या दुप्पट झाली आहे. सेंट्रल बँकेसह अन्य बँकांनी आपल्या शाखांमध्ये धनादेश वटविण्यासाठी असलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वाढीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.