शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी बंद तरीही व्यापा:यांची वाहने बाजार समितीत

By admin | Updated: May 29, 2017 00:56 IST

जामनेर : खरेदी केंद्रावरील गोंधळ थांबेना; शेतकरी संतप्त, तीन वाहने पोलीस ठाण्यात

जामनेर : येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावरील सावळा गोंधळ थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. खरेदी केंद्रावर रविवारी तूर आणू नये, असे आवाहन खुद्द सभापतींनी केल्यानंतरही आज सकाळी व्यापा:यांची तुरीने भरलेली तीन वाहने बाजार समितीच्या आवारात दिसल्याने शेतक:यांना संताप अनावर झाला. तहसीलदारांनी वाहने जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण निवळले.वाढती आवक पाहता रविवारी तूर खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतरही सकाळी दुस:या गेटने व्यापा:यांची तीन वाहने आवारात आल्याचे पाहून शेतक:यांनी ही माहिती पत्रकार व शेतकरी संघाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांना दिली. तहसीलदार नामदेव टिळेकर, बाविस्कर, डॉ. सुरेश पाटील यांनी तिघा वाहनांची पाहणी केली. तिन्ही वाहने व्यापा:यांची असल्याची खात्री झाल्यावर ती पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.वाहनधारकांकडे टोकण, शेतकरी रांगेतचजप्त करण्यात आलेल्या वाहनधारकांकडे असलेली तूर ही व्यापा:यांचीच असल्याचे त्यांच्याकडील सातबारा उता:यावरून स्पष्ट होत होते. मात्र त्यांच्याकडे बाजार समितीचे टोकण कसे आले, याचाही शोध घेतला जावा, अशी मागणी केली गेली. व्यापारी व बाजार समिती पदाधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताशिवाय हे अशक्य असल्याचे या वेळी शेतकरी उघडपणे बोलत होते.  एकीकडे टोकणसाठी शेतकरी रांगेत उभा राहूनदेखील त्याला टोकण मिळत नाही, तर व्यापा:यांना सर्रासपणे टोकण देणारे कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. ‘व्यापा:यांचीच चलती, शेतकरी अडगळीत’ असे वृत्त रविवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची प्रचिती आजच्या प्रकाराने सर्वासमोर आल्याने शेतक:यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले.बाजार समितीचे पोलिसांना पत्रदरम्यान, बाजार समितीच्या सचिवांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रविवारी तूर खरेदी बंद असतानादेखील तुरीच्या गोण्या भरलेली तीन वाहने दुस:या गेटने आवारात आलेली पाहून शेतकरी संतप्त झाले. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तिन्ही वाहने जमा करीत आहोत. चौकशी करावी. या वाहनांमध्ये 127 गोणी तूर असल्याचे पत्रात म्हटले आहे.शासकीय तूर खरेदी केंद्रावर मोजणी झालेल्या तुरीचा तपशील तपासून बाजार समितीच्या आवारात मोजणीअभावी पडून असलेल्या तुरीचे रेकॉर्ड मागविण्यात आले आहे. त्याची चौकशी केली जाईल.- नामदेव टिळेकर, तहसीलदार, जामनेरतूर खरेदी केंद्र हे शेतक:यांसाठी असून, त्यांचा माल मोजण्याचा प्रामाणिक प्रय} आहे. मात्र, व्यापारी याचा गैरफायदा घेत असल्याने गोंधळ वाढत आहे. शेतक:यांनी व्यापा:यांना सहकार्य करू नये.-चंद्रकांत बाविस्कर, चेअरमन, शेतकरी संघ, जामनेर