शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खरे लाभार्थी उपाशी, दलाल, अधिकारी तुपाशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला मागासवर्गीय लाभार्थी आवश्यक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला मागासवर्गीय लाभार्थी आवश्यक आहे. १० हजार रुपये अनुदान व ९० हजार रुपये बँक कर्ज असा एक लाख रुपयांचा लाभ लाभार्थ्याला दिला जातो. येथे या लाभार्थ्यांच्या नावाने इतर समाजातील लोकांनाच लाभ झाल्याचे उघड झालेले आहे. कोट्यवधी रुपयांचा अपहार या योजनेत संगनमताने करण्यात आला आहे.

दरम्यान, अटकेतील संदीप प्रभाकर सावळे (वय ३६,रा.भुसावळ) हाच मु‌ख्य एजंट असून त्याने इतरांच्या नावाने बँकेत पैसे वळविले आहेत. संजीव वसंत सोनवणे या सेतू कक्षाचे काम करणाऱ्या तरुणाच्या करंट खात्यावर १ कोटी ३ लाख रुपये जमा केले. त्याच्याकडून एटीएम कार्ड व धनादेश घेऊन ही रक्कम काढण्यात आलेली आहे. सावळे याने या गुन्ह्यात मदत केली नाही तर ॲट्रासिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी सोनवणे याला दिली होती, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी दिली.

या गुन्ह्यात याआधी महामंडळाचा व्यवस्थापक खंडू विठोबा लोहकरे (वय ४६,रा.नाशिक), अकांऊटंट सागर वसंत अडकमोल (वय ३९,रा.रविराज कॉलनी), बँकेचा उपव्यवस्थापक सुनंदा बाबुराव तायडे (वय ५९,रा.वानखेडे हौसिंग सोसायटी), शिपाई प्रकाश लक्ष्मीकांत कुळकर्णी (रा.राधाकृष्ण नगर), अमरीश अनिल मोकाशी (रा.सदगुरू नगर) व संजीव वसंत सोनवणे (रा.भुसावळ) यांना अटक झालेली आहे तर मुकेश देवराम बारमासे (रा.नागपूर) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. यातील मोकाशी याच्या बँक खात्यातही ५९ लाख रुपये वर्ग झाले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याचे वाढीव कलम लावण्यात आलेले आहे.

झोपडीत राहणाऱ्यांच्या खात्यात कोटीची रक्कम

भुसावळमधील एका बनावट व्यक्तीच्या बँक खात्यात १ कोटी रुपयांची रक्कम झाली आहे. या व्यक्तीच्या खात्यात कधी दहा हजार रुपये नव्हते. त्याशिवाय अनेकांच्या खात्यावर १ ते १० लाखापर्यंत रक्कम जमा झाली आहे. या लोकांना पाच ते हजार रुपये देऊन ही रक्कम दलालांनी काढून घेत साखळीतील सर्वांनी वाटून घेतल्याचे तपासात उघड झालेले आहे.

काय आहे प्रकरण

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, बँकेचे अधिकारी व दलाल यांनी संगनमत करून शासनाच्या बीज भांडवल योजनेत जे लाभार्थी अस्तित्वातच नाहीत अशांच्या नावे बोगस कर्ज प्रकरण तयार करुन एकाचा फोटो, दुसऱ्याचे आधारकार्ड, तिसऱ्याचा पत्ता अशा प्रकारे बनावट दस्ताऐवज तयार करून ते खरे आहे, असे दाखविले. ७०२ बोगस लाभार्थी दाखवून साडेसहा कोटी रुपये शासनाचे लुटले आहेत. एकूण २३ लोकांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत हा प्रकार घडलेला आहे. याप्रकरणी महात्मा फुले मागासर्वीय विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली अनिश जाधव यांच्या फिर्यादीवरून २ ऑगस्ट २०१९ रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.या गैरप्रकारामुळे मूळ लाभार्थ्यांना लाभ मिळालाच नाही.

कोट...

या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आरोपींची संख्यादेखील तितकीच मोठी आहे. ज्या-ज्या लोकांच्या खात्यात रक्कम झाली त्या सर्वांना यात आरोपी केले जाणार आहे. थोड्या पैशांच्या आमिषाला बळी पडून गुन्हा करणाऱ्यांना या लोकांनी मदत केली आहे. बँकेतील अधिकारी, कर्मचारी व महामंडळाचे कर्ज प्रकरण तयार करणारे, मंजूर करणारे व लाभ घेणारे या सर्वांविरुध्द कारवाई केली जाणार आहे.

-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा