शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

तिघा तरुणांकडे सापडले पिस्तूल अन् चॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

जळगाव : पिंप्राळा भागातील भवानी मंदिराजवळील एका पानटपरीवर थांबलेल्या महेश वासुदेव पाटील (वय २१, रा. हिरा शिवा कॉलनी) याच्याजवळ ...

जळगाव : पिंप्राळा भागातील भवानी मंदिराजवळील एका पानटपरीवर थांबलेल्या महेश वासुदेव पाटील (वय २१, रा. हिरा शिवा कॉलनी) याच्याजवळ गावठी पिस्तूल तर आकाशवाणी चौकात कल्पेश अर्जुन चौधरी (वय २६, रा. विठ्ठल पेठ) व गोकूळ दिलीप शिंपी (वय २०, रा. मारुती पेठ) या दोघांजवळ चॉपर आढळून आले. महेशजवळ एक मॅग्झिनही मिळून आले. याप्रकरणी रामानंद नगर व जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळ्यात पानटपरीवर आलेल्या एका तरुणाकडे गावठी पिस्तूल असल्याचा निनावी फोन पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना आला होता. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी, विनोद सोनवणे, रवी पाटील, सागर देवरे व संजय सपकाळे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले असता, महेश याच्याजवळ पिस्तूल आढळून आले. परवानाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने नकार दिला. घटनास्थळावरच पंचनामा करून पिस्तूल जप्त करण्यात आले तर महेश याला अटक करण्यात आली.

शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता आकाशवाणी चौकात थांबलेल्या कल्पेश अर्जुन चौधरी (वय २६, रा. विठ्ठल पेठ) व गोकूळ दिलीप शिंपी (वय २०,रा मारुती पेठ) यांची गस्तीवरील पोलिसांनी झडती घेतली असता खिशात चॉपर आढळून आला. दुचाकी व चॉपरसह त्यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांना अटक करण्यात आली आहे.