शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खांब हटविण्याबाबत बांधकाम विभागाचे तीन वेळा पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:44 IST

शिवाजीनगर उड्डाणपूल : बांधकाम विभागाचे तीन वेळा पत्र, आयुक्तांकडून उत्तर नाही

जळगाव : रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर उड्डाण पुलावरील रेल्वे हद्दीतील बहुतांश काम आटोपले आहे. दुसरीकडे रस्त्यावरील विद्युत खांब आणि जलवाहिनी असल्यामुळे मोठाच अडथळा निर्माण झाला आहे. ते दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मनपा आयुक्तांना तीन वेळा पत्र पाठविण्यात आले आहेत. मात्र, या पत्रांवर मनपा आयुक्तांकडून कुठलेही उत्तर देण्यात आलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.रेल्वे प्रशासनाने शिवाजी पूलावरील वाहतूक बंद करुन, २५ फेब्रुवारीपासून उड्डाण पूलावरील रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यांत खोदाईचे काम पूर्ण झाले असून, ९ एप्रिल रोजी गर्डर काढण्याचा अंतिम ठप्पाही पूर्ण केला जाणार आहे.रेल्वे प्रशासनाने कामाला सुरुवात केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानदेखील मक्तेदारामार्फत जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. यावेळी गर्डर काढण्यासाठी पुलाच्या खोदाईचे काम न करता, जोड रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन बांधकाम विभागाचे होेते. मात्र, या ठिकाणी पत्र्या हनुमान मंदिरासमोर असलेले महावितरणचे खांब व जलवाहिनीमुळे हे काम सुुरुच करण्यात आले नव्हते.या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विद्युत खांब व जलवाहिनी स्थलांतरित करण्यासंदर्भात तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांना पत्र पाठविले होते.मात्र, त्यांच्या या पत्रावर आयुक्तांकडून कुठलेही उत्तर देण्यात आले नाही. यानंतर पुन्हा आयुक्तांशी दोन वेळा पत्र व्यवहार करण्यात आला.पत्राला उत्तर मिळेनाशिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे झालेल्या बैठकीत, जिल्हाधिकाऱ्यांनी मनपाला महावितरणकडून या ठिकाणचे विद्युत खांब व पाण्याचे पाईपलाईन स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या होत्या. या सुचनांना अनुसरुन सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मनपा आयुक्तांना पत्र व्यवहार करण्यात येत होता.दीड महिन्यात तब्बल सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आयुक्तांना तीन वेळा पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र, पत्रांमुळे विद्युत खांब ना पाईपलाईनचे स्थलांतर झाले नसून, या पत्राला आयुक्तांकडून उत्तरही देण्यात आलेले नाही.या तारखांना दिली गेली पत्रसार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता या नावाने मनपा आयुक्तांना तीन वेळा पत्र दिले गेले. यामध्ये पहिले पत्र पहिले पत्र २० फेब्रुवारीला, दुसरे ६ मार्चला व तिसरे ३० मार्चला दिले आहे.जिल्हा परिषदेजवळील पत्र्या हनुमान मंदिरापासून ते टॉवर चौकापर्यंत रस्त्याच्या मधोमध असलेली विद्युत खांबाची रांग स्थलांतरित करण्यासंदर्भात तीन वेळा आयुक्तांना पत्र दिले आहे. तसेच या ठिकाणी जल वाहिनी आहे. त्यादेखील स्थलांतरित करण्यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. बांधकाम विभागातर्फे करण्यात येणाऱ्या पुलाच्या कामासाठी हे अडथळे हटणे गरजेचे आहे. मात्र, मनपाकडून आमच्या पत्राला कुठलेही उत्तर देण्यात आलले नाही. अडथळे दूर झाल्यावरच पुढील कामाला सुरुवात होईल.-प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सा. बां.विभाग, जळगावशिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. त्या बजेटमध्ये अडथळा ठरणाºया विद्युत लाईनच्या स्थलातरांचा व ग्राऊंड केबलचा खर्चही त्यांत समाविष्ट करणे गरजेचे आहे. त्या विद्युत लाईनवर व्यावसायिकांचे कनेक्शनदेखील आहेत. त्या संदर्भात महापालिका प्रशासनातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आले आहे. मनपा अंतर्गंत येणारे विद्युत पोल व पाईपलाईनही लवकरच स्थलांतर करण्यात येईल.-डॉ.उदय टेकाळे, आयुक्त, मनपा