शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

तीन यंत्रे पडली बंद, फेरमतमोजणी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST

जळगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान तीन यंत्रे बंद पडल्याच्या घटना घडल्या. यामुळे उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी ...

जळगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान तीन यंत्रे बंद पडल्याच्या घटना घडल्या. यामुळे उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फेर मतमोजणी करण्याची मागणी केली. मात्र ती मागणी नाकारण्यात आल्याने उमेदवारांनी प्रशासनाच्या कारभारावर आक्षेप घेतला. विशेष म्हणजे मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायतीची मतमोजणी अर्ध्या तासात पूर्ण झाली खरी मात्र निकाल दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात आला.

तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींची मतमोजणीला सोमवार, १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून नूतन मराठा महाविद्यालयात सुरूवात झाली. या वेळी त्या-त्या ग्रामपंचायतींच्या मतमोजणीवेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

फेरमोजणीसाठी लगेच मागणी का केली नाही ?

शिरसोली प्र.बो. येथील प्रभाग क्रमांक सहा मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर तसेच याच प्रभागात नामप्र महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर विजयी उमेदवारांमध्ये कमी मतांचे अंतर असल्याने तसेच धानवड येथील प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवारांनी आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र ती फेटाळण्यात आली व मतदान यंत्र सुरू होते त्याच वेळी मागणी का केली नाही, असे म्हणत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांची मागणी नाकारली. त्या वेळी उमेदवारांना पोलिसांच्या मदतीने बाहेर जाण्यास सांगण्यात आले. यामुळे उमेदवारांसह समर्थक नाराज झाले होते.

तीन यंत्रे बंद पडलीमतमोजणी सुरू असताना तीन यंत्रे बंद पडल्याच्या घटना घडल्या. यामुळे उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फेर मतमोजणी करण्यास सांगितले. तेथेच काही उमेदवारांनी आताच मोजणी करण्याचा आग्रह धरला. मात्र तो नाकारण्यात आला.

पाॅईन्टर

माध्यम प्रतिनिधी, छायाचित्रणास केली बंदी

मीडिया कक्ष नावाला

मास्क नसताना अनेक जण पोहचले मतमोजणी कक्षापर्यंत

मोबाईल आढळल्याने काढले बाहेर

मतमोजणी कक्षात मोबाईल नेण्यास बंदी होती. सर्वांना तपासणी करूनच मतमोजणी कक्षात सोडण्यात येत होते. तरीदेखील एक प्रतिनिधी मोबाईल घेऊन मतमोजणी कक्षात पोहचला होता. मात्र मध्ये त्याच्याकडे मोबाईल असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. नंतर त्याने मोबाईल इतरांकडे देऊन पुन्हा मतमोजणी कक्षात पोहचला.

ओळखपत्राविना कर्मचारी दाखल

मतमोजणी कक्षात ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात होता. मात्र तहसील कार्यालयाची एक महिला कर्मचारी ओळकपत्राविना आल्याने तिला पोलिसांनी मतमोजणी कक्षात प्रवेश नाकारला. अखेर तहसीलदारांशी बोलणे करुन देऊन विना ओळखपत्र या महिलेला आत सोडण्यात आले. अशाच प्रकारे मतमोजणीसाठी जाणाऱ्या प्रतिनिधीच्या पासवर छायाचित्र नसताना त्यालाही प्रवेश देण्यात आला.