शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुक्यात तलावात बुडून दोन युवक मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 20:55 IST

१३ वर्षीय मुलीचा विषबाधेने मृत्यू

अमळनेर : तालुक्यात रविवार हा घातवार ठरला असून दोघा तरुणांचा पाण्यात बुडून तर एका अल्पवयीन मुलीचा विषारी पदार्थ सेवनाने मृत्यू झाला.पोहताना पाण्यात बुडून युवकाचा मृत्यूतालुक्यातील पळासदळे येथील हेमंत संजय पाटील (वय २२) हा परिसरातील चिखली नदीच्या बंधा?्यावर दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.हेमंत हा नौदलात भरती होण्यासाठी प्रयत्न करीत होता. त्यासाठीच सरावाचा भाग म्हणून तो पोहत होता. गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाजी साहेबराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास भरत ईशी करीत आहेत.विसर्जन करताना तलावात तरुणाला जलसमाधीप्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी अंकित चतुर पाटील (वय २२) हा गणपती विसर्जनासाठी धार येथील पाझर तलावात गेला असता त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली. प्रताप महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या गणपती विसर्जनासाठी धार तलावावर पाण्यात जात असताना तेथील ग्रामस्थांनी त्याला हटकले. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पुढे गाळ असल्यामुळे तो त्यात फसला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अंकित हा कुरखेडी (ता. शिरपूर) येथील रहिवासी होता. तो प्रताप महाविद्यालयात बी.एस्सीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. मुख्य रेक्टर विद्यार्थ्यांसोबत नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपस सुनील हटकर करीत आहेत. शून्य नंबरने हा गुन्हा मारवड पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात येणार आहे.जवखेडा येथील प्रीती लक्ष्मण पाटील (वय १३) मूळ रा.बाळद, ता.भडगाव हिचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाला.प्रीती घरात असताना तिने विषारी औषध सेवन केले. शेजारी राहणा?्या प्रकाश पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस पाटील उल्हास लांडगे यांना कळविले. त्यावेळी तिच्या तोंडातून फेस येत असल्याने दीपक पाटील, नगराज पाटील गिरधर पाटील यांच्या मदतीने तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी प्रकाश ताडे यांनी तिला मृत घोषित केले. पोलीस पाटील उल्हास लांडगे यांच्या खबरीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक प्रशांत वाडीले करीत आहेत.