शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ३० नगरसेवकांनी केली राजकीय आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ज्या नगरसेवकांना भाजपने संधी दिली, भाजपच्या जिवावर नगरसेवक बनविले, त्या नगरसेवकांनी भाजपला सोडून राजकीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ज्या नगरसेवकांना भाजपने संधी दिली, भाजपच्या जिवावर नगरसेवक बनविले, त्या नगरसेवकांनी भाजपला सोडून राजकीय आत्महत्या केली असून, लवकरच भाजपमधून फुटून गेलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही माजी मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी बालाणी लॉनवर झालेल्या बैठकीत दिली आहे.

शिवसेनेकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याचा धमाका सुरूच आहे. शनिवारी भाजपचे तीन नगरसेवक फोडल्यानंतर रविवारी भाजपकडून डॅमेज कंट्रोलसाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या उर्वरित २७ नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपचे सर्व २७ नगरसेवक उपस्थित होते. त्यांच्यासह महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे हे देखील उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला गिरीश महाजन यांनी सर्व नगरसेवकांना त्यांची पक्षाबद्दल असलेली नाराजी व्यक्त करण्याचे जाहीरपणे सांगितले. तसेच ज्या नगरसेवकांना पक्ष सोडून जायचे असेल, त्यांनी नाराजीचे कारण देखील सांगावे, असेही महाजन यांनी या बैठकीत नगरसेवकांना सांगितले. पक्षाने ज्या नगरसेवकांवर विश्वास टाकला, त्या नगरसेवकांनी पक्षाचा विश्वासघात करून आपल्या पायावर धोंडा मारण्याचे काम केले आहे. त्यांचे राजकीय अस्तित्वच यामुळे धोक्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच कामकाज करून, त्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वैयक्तिकपणे केली नगरसेवकांशी चर्चा

महाजन यांनी या बैठकीनंतर काही नगरसेवकांशी वैयक्तिक चर्चादेखील केली. तसेच महापालिकेत सत्ता आणण्यासाठी पक्षाने जे प्रयत्न केले होते, त्या प्रयत्नांवर काही पैशांसाठी पाणी फिरू देऊ नका, असेही आवाहन महाजन यांनी केले. दरम्यान, १ जून रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौर्‍यावर येत असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी नगरसेवकांना काही सूचना दिल्या. बैठकीत स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.