शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

भादलीतील महिला राखीव प्रवर्गातून तृतीयपंथीय अंजली पाटील विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST

जळगाव : सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातून ‘इतर’ म्हणून उमेदवारी अर्ज नाकारलेल्या व नंतर न्यायालयीन लढ्यात ...

जळगाव : सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातून ‘इतर’ म्हणून उमेदवारी अर्ज नाकारलेल्या व नंतर न्यायालयीन लढ्यात उमेदवारी मिळालेल्या भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील (गुरू संजना जान) या विजयी ठरल्या आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी मीना हरुल पटेल यांचा १७४ मतांनी पराभव केला.

भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील यांनी महिला राखीवमधून अर्ज दाखल केला होता. यात त्यांनी ‘लिंग’ प्रकारापुढे ‘इतर’ असे नमूद केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली व त्यांना स्त्री संवर्गातून निवडणूक लढविण्यास परवानगी मिळाली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रभागात जोमाने प्रचार केला व यात त्यांना अखेर यश मिळाले.

१५ जानेवारी रोजी झालेल्या मतदानानंतर अनेक जण विजयाचे दावे करीत होते. मात्र अंजली यांनी शांत राहत निकालाची प्रतीक्षा केली व सोमवारी सकाळी झालेल्या मतमोजणीत वॉर्ड क्रमांक चारमधून अंजली पाटील या विजयी ठरल्या. त्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथीय लोकप्रतिनिधी बनल्या आहेत.

भादली ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होताना सर्वांनाच याबाबत उत्सुकता हेाती. विजयाची घोषणा होताच त्याच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

गेल्या वेळी पराभव, आता विजयी पताका

अंजली पाटील यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्या वेळी त्यांचा केवळ ११ मतांनी पराभव झाला होता. मात्र या वेळी त्यांनी तब्बल ५४८ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी मीना हरुल पटेल यांना ३७४ मते मिळाली.

जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आले. आता गावातील समस्या माझ्या जबाबदारीने मी सोडविणार असून माझ्या उमेदवारीवर दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवेन.

- अंजली पाटील, विजयी तृतीय पंथीय उमेदवार.