शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफाॅर्म पाचवरही होणार नवीन लिफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

जळगाव : रेल्वे स्टेशनवर यापूर्वी दोन लिफ्ट बसविण्यात आल्या असून, प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच प्लॅटफाॅर्म क्रमांक पाचवरही लिफ्ट बसविण्यात येणार ...

जळगाव : रेल्वे स्टेशनवर यापूर्वी दोन लिफ्ट बसविण्यात आल्या असून, प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच प्लॅटफाॅर्म क्रमांक पाचवरही लिफ्ट बसविण्यात येणार आहे. याबाबत डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी स्थानिक रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या असून, डीआरएम यांच्या सूचनेनंतर स्थानिक रेल्वे प्रशासनातर्फे नवीन तयार करण्यात आलेला दादराही खुला करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षात जळगाव रेल्वे स्टेशनवर प्लॅटफाॅर्मची उंची वाढवणे, लोहमार्ग पोलिसांसाठी नवीन पोलीस चौकी, सरकते जीने, नवीन लिफ्ट, संरक्षण भिंती, नवीन तयार करण्यात आलेला पाचवा प्लॅटफाॅर्म तर गेल्यावर्षीच तयार करण्यात आलेल्या नवीन दादऱ्याचाही यात समावेश आहे. करोडो रुपयांची विकासकामे जळगाव रेल्वे स्टेशनवर करण्यात आलेली आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळली आहे. तसेच आता प्लॅटफाॅर्म क्रमांक पाच वरूनही सुरत रेल्वे मार्गावरच्या गाड्या धावायला सुरुवात झाली आहे; मात्र या प्लॅटफाॅर्मवर लिफ्ट नसल्यामुळे वयोवृद्ध व दिव्यांग प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी या प्लॅटफाॅर्मवरही नवीन लिफ्ट बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. डीआरएम यांनी नुकतीच जळगाव स्टेशनची पाहणी केली असता, त्यांना प्लॅटफाॅर्म क्रमांक पाचवर जाण्यासाठी वयोवृद्ध व दिव्यांग प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी तत्काळ स्थानिक प्रशासनाला नवीन लिफ्टबाबत नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

इन्फो :

उद्घाटनाची वाट न पाहता दादरा खुला :

रेल्वे प्रशासनातर्फे स्टेशनमध्ये प्रवेश करताना उजव्या बाजूने, तिकीट आरक्षण खिडकीसमोर नवीन दादरा उभारण्यात आला आहे; मात्र कोरोनामुळे रेल्वे बोर्डातर्फे या दादऱ्याच्या उद्घाटनाबाबत परवानगी मिळत नसल्यामुळे, काम पूर्ण होऊनही सहा महिन्यांपासून हा दादरा प्रवाशासांठी खुला करण्यात आला नव्हता. यामुळे सध्या सुरू असलेल्या एकच दादऱ्यावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत होती. अखेर डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी उद्घाटनाच्या मंजुरीची वाट न पाहता, प्रवाशांच्या सोयीसाठी हा दादरा सुरू करण्याच्या सूचना केल्यानंतर, स्थानिक रेल्वे प्रशासनाने हा दादरा प्रवाशांसाठी खुला केला आहे. विशेष म्हणजे या नवीन दादऱ्यावर रॅम्पचीदेखील सुविधा असल्यामुळे वयोवृद्ध व दिव्यांग प्रवाशांचा त्रास वाचला आहे.

तर रखडलेली कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना :

डीआरएम गुप्ता यांनी जळगाव स्टेशनच्या केलेल्या पाहणीत संरक्षण भिंत, वातानुकूलित कक्षाची उभारणी व इतर तांत्रिक कामे अपूर्ण असल्याचे दिसून आले; मात्र कोरोनामुळेही कामे लांबणीवर पडली असल्याचे स्थानिक प्रशासनातर्फे सांगण्यात आल्यावर, गुप्ता यांनी आता कोरोनाचे कारण न सांगता रखडलेली कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.