शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

‘गोलाणी’ तील त्या तलावावर कायमचा तोडगा हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गोलाणी मार्केटमधील तळमजल्यावर साचणाऱ्या पाण्याचा समस्येचा मुद्दा ‘लोकमत’ ने प्रकाशित केल्यानंतर शनिवारी महापौर जयश्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गोलाणी मार्केटमधील तळमजल्यावर साचणाऱ्या पाण्याचा समस्येचा मुद्दा ‘लोकमत’ ने प्रकाशित केल्यानंतर शनिवारी महापौर जयश्री महाजन यांनी गोलाणी मार्केटमधील तळमजल्याची पाहणी केली. तसेच आरोग्य विभागाला धारेवरधरत ही समस्या मार्गी लावण्याचा सूचना महापौरांनी दिल्या आहेत. मात्र, एकावेळेस पाहणी केल्यानंतर किंवा सूचना दिल्यानंतर ही समस्या मार्गी लागणार नसून, या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याची गरज आहे.

गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात गटारीचे पाणी साचल्यामुळे हा तळमजला तलावासारखाच भासत असून, ही समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. याबाबत अनेकवेळा वृत्त प्रसिध्द केल्यानंतर लोकप्रतिनिधींकडून पाहणीचा आणि सूचनांचा सोपस्कार केला जात असतो, मात्र काही दिवसांमध्ये पुन्हा हीच परिस्थिती निर्माण होत असते. महापौर जयश्री महाजन यांनी शनिवारी गोलाणी मार्केटच्या तळमजल्याची पाहणी केली. यावेळी आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील, प्रभाग समिती एकचे अधिकारी व्ही.ओ.सोनवनी, आरोग्य निरीक्षकांसह मनपाचे काही कर्मचारी उपस्थित होते.

सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने समस्या

तळमजल्यातील एकाच भगात ही समस्या निर्माण होत असते. याठिकाणच्या सांडपाण्याचा कोणताही निचरा हा होत नाही. तसेच अनेक वर्षांपासून चेंबरमधील घाण देखील साफ करण्यात आलेली नाही. मनपा कर्मचाऱ्यांनी शनिवारी व्हॅक्यूम क्लिनर व्हॅनसह यंत्रणेच्या सहाय्याने संपूर्ण चोकअप चेंबर उघडून मनपा कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा निचरा करण्यासह तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला. दरम्यान, या गंभीर समस्येसंदर्भात महापौर जयश्री महाजन यांनी पुन्हा सायंकाळी आपल्या दालनात आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक बोलावून गोलाणी मार्केटमधील विविध प्रश्नांसंदर्भात कुठलीही कारणे न सांगता तेथील समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासंदर्भात तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले. दरम्यान, याठिकाणचा सांडपाण्याचा निचरा हा कायमस्वरुपी होत रहावा यासाठी अभियंत्यांना पाहणी करून, आठवड्याभरात समस्या मार्गी लावण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.