शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महानिरीक्षकांच्या नावावर एकमत होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST

जळगाव : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक हे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे. या पदावर अनेक अधिकाऱ्यांचा डोळा ...

जळगाव : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक हे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे. या पदावर अनेक अधिकाऱ्यांचा डोळा असून त्यादृष्टीने अनेकांनी प्रयत्न चालविले असले तरी सरकार पातळीवर मात्र मतभिन्नता असल्याने कोणत्याच एका नावावर ठाम मत होत नाही. त्यामुळे त्याचा सस्पेन्स अधिकच वाढत चालला आहे. दरम्यान, पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे व सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे ही दोन नावे सध्या तरी आघाडीवर आहेत.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. कोणत्याही जिल्ह्यात महत्त्वाच्या पदावर अर्थात सुपरक्लासवन अधिकारी नियुक्त करायचा असेल तर त्या-त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची ‘एनओसी’ आवश्यक असल्याचे सूत्र ठरविण्यात आल्याचे बोलले जात आहे. हे सूत्र विभागीय महसूल आयुक्त व परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यासाठी लागू होत नाही. एका परिक्षेत्रात किमात चार ते पाच जिल्हे येत असल्याने प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षाचे पालकमंत्री आहेत. त्यातही मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे तर गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे आहे. तीन पक्षांचे सरकार असल्याने गुंता अधिकच वाढला. प्रताप दिघावकर यांना सेवानिवृत्त होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीदेखील अद्यापही त्यांच्याजागी नवीन महानिरीक्षकांची नियुक्ती झालेली नाही. पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांच्याकडे तात्पुरता पदभार आहे.

इन्फो..

या पाच अधिकाऱ्यांच्या नावावर चर्चा

विशेष पोलीस महानिरीक्षक पदासाठी सर्वात जास्त आघाडीवर पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे व सोलापूरचे आयुक्त अंकुश शिंदे ही दोन नावे आहेत. त्याशिवाय राजेश प्रधान, ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे व पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याही नावांची चर्चा आहे. शिंदे, कराळे व डॉ. सुपेकर हे तीन अधिकारी पूर्वी जळगावला अधीक्षक होते. यापैकी कराळे व सुपेकर यांची रँक उपमहानिरीक्षकाची आहे. अमरावती परिक्षेत्रात आरती सिंह यांना देण्यात आले आहे, त्यांची देखील रँक उपमहानिरीक्षकाचीच आहे. सरकारमध्ये एकमत झाले तर या दोघांपैकी एक नाव निश्चित होऊ शकते. त्यातही कराळे यांचे नाव आघाडीवर आहे. शक्यतो मराठी आयपीएस अधिकाऱ्याचीच या ठिकाणी नियुक्ती व्हावी असाही एक सूर सरकारमध्ये आहे. प्रवीण पडवळ, मकरंद रानडे व कैसर खालीद या तीन नावांची देखील मध्यंतरी चर्चा झाली होती. खालीद यांचा सुरुवातीलाच अमळनेर येथे परिविक्षाधीन कालावधी झालेला आहे.