शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कजगाव परिसरात चोरीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST

कजगाव, ता. भडगाव : कजगाव परिसरात चोरीचे सत्र थांबण्यास तयारच नाही. दि. ७ च्या मध्यरात्रीनंतर येथील पाच पावली माता ...

कजगाव, ता. भडगाव : कजगाव परिसरात चोरीचे सत्र थांबण्यास तयारच नाही. दि. ७ च्या मध्यरात्रीनंतर येथील पाच पावली माता नगरमधील रहिवासी रवींद्र पांडुरंग कोळी यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. गेल्या महिन्याभरापासून सुरू झालेले चोरीचे सत्र थांबण्यास तयारच नसल्याने घबराट पसरली आहे.

गेल्या महिन्यात एकाच रात्रीत चक्क तीन घर फोडत अज्ञात चोरट्यांनी कजगावात चोरीचे सत्र सुरू केले. अमावास्येच्या रात्री बहोनी करत चोऱ्या सुरू झाल्या आहेत. या तीन घरफोड्यांचा तपास लागत नाही, तोच चोवीस तासांनंतर रस्तालूट, काही दिवसांनी दिवसाढवळ्या दुचाकी चोरी अशा घटना घडल्या आहेत.

चोवीस तासांत चक्क दोन दुचाकी लांबविल्या. या साऱ्या चोऱ्याचा तपास सुरू आहे. मात्र पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, कजगावपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भोरटेक येथून मुख्य रस्त्यालगत असलेल्या कम्पाउंडच्या शेडमधून चार गायी अज्ञात चोरट्यांनी लाबविल्या होत्या. या साऱ्या चोऱ्यांची चर्चा सुरू असतानाच पुन्हा दि. ७ च्या मध्यरात्रीनंतर कजगाव भडगाव या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या पाच पावली माता नगरमधील रहिवासी रवींद्र पांडुरंग कोळी यांची घराजवळ लावलेली दुचाकी (एमएच१९/बीएल८७०१) ही अज्ञात चोरट्यांनी लांबवली.