सर्जा राजाचे स्वागत व पोळ्याची तयारी झालेली असताना परिवारातील सदस्यांप्रमाणे जीव लावलेले पशुधनाची खुंटीवरून चोरी झाली.
घुसर्डी ते नगरदेवळा रस्त्यालगत घुसर्डी शिवारातील गोठ्यात खासेराव व जयवंतराव पतंगराव देशमुख यांची खुंट्याला बांधलेली सर्जाराजाची बैलजोडी व जगन्नाथ त्र्यंबक देशमुख यांच्या २ गायीही अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्या. पोळ्याच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री घडलेल्या घटनेत शेतकऱ्यांचे जवळपास दीड ते दोन लाखांचे नुकसान झालेले आहे. या घटनेचा पोलिसांनी तत्काळ छडा लावावा, अशी मागणी घुसर्डी परिसरातील शेतकरी वर्गात होत आहे. पोळा सणाला सर्वत्र सर्जाराजाच्या स्वागताची तयारी सुरू असताना बैलजोडीसह गायी चोरी गेल्याने जोडी पूजनापासून शेतकरी वंचित राहिले. परिसरात दिवसागणिक पशुधन चोरीच्या वाढत्या घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहेत. याबाबत नगरदेवळा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
फोटो