शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाची मुलेही जि. प. शाळेतच

By admin | Updated: May 13, 2017 15:59 IST

विविध कार्यासाठी पुढाकार घेत स्वत: च्या मुलांनाही जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करून एक आदर्श समाजापुढे उभा केला आहे

ऑनलाइन लोकमत / हितेंद्र काळुंखे  चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 13 - चाळीसगाव तालुक्यातील  कुंझर येथील  रहिवासी आणि सध्या एरंडोल तालुक्यातील गालापूर येथे  जि. प. शाळेत कार्यरत असलेले शिक्षक किशोर रमेश पाटील यांनी जनजागृती, वृक्षारोपण, शैक्षणिक विकास अशा विविध कार्यासाठी पुढाकार घेत  स्वत: च्या मुलांनाही जिल्हा  परिषदेच्या शाळेतच दाखल करून एक आदर्श समाजापुढे उभा केला आहे. सध्या  जि. प.च्या शाळेचे अनेक  शिक्षक आपल्या मुलांना आपल्या स्वत: च्या शाळेचा दर्जा ओळखून इतर खाजगी अथवा इंग्रजी माध्यमाच्या  शाळेत टाकताना दिसतात मात्र किशोर पाटील हे यास अपवाद ठरले आहे. गेल्या 16 वर्षापासून ते जि. प. शाळेत शिक्षक म्हणून आहे. गेल्या वर्षार्पयत ते एरंडोल तालुक्यातील तळई येथे होते. याच शाळेत त्यांचा मुलगा क्षितीज हा पहिली ते चौथी र्पयत शिकला. या शाळेत त्यांनी सेमी इंग्लिश मीडियमची सुरुवात  केली आहे. राज्यात सर्वप्रथम हीच शाळा पहिली  सेमी इंग्लिश ठरली. या वर्षी त्यांची बदली गालापूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत भिल्ल वस्ती जि. प. शाळेत झाली असून त्यांची मुलगी प्रांजल हीदेखील दुसरीत याच शाळेत शिक्षण  घेत आहे.समितीत क्रियाशील सदस्यमुलांची आंघोळ करण्यापासून ते भिल्लवस्ती शाळेला आयएसओ करणेर्पयतचे कार्यही त्यांनी केले आहे. पटसंख्या वाढवून अनेक उपक्रम व  प्रयोग राबवून त्यांनी राज्यातील कृतीशील शिक्षकांना प्रेरणा दिली आहे.  त्यांच्या या कार्याची दखल घेत शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छ विद्यालय, स्वच्छ  महाराष्ट्र या राज्याच्या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  गठीत झालेल्या टास्कफोर्सवरील समितीत क्रियाशील सदस्य म्हणून नुकतीच त्यांची निवड झाली आहे.जनजागृतीचे कामबेटी बचाओ-बेटी पढावो, शौचालयाचा वापर करा, मुलांना जि.प.शाळेत  दाखल करा आदी संदेश बैलपोळ्याच्या दिवशी बैलांच्या अंगावर ते रंगवतात. हा जनजागृतीचा उपक्रम गत 10 वर्षापासून ते राबवत आहे. एवढेच नाही तर शाळा आवारातही त्यांनी अनेक झाडे लावून ती वाढविण्यासाठी परिश्रम घेतली. कुंझर शाळेला बांधून दिले प्रवेशद्वारपाटील यांचे मूळ गाव कुंझर हे चाळीसगाव तालुक्यात डोंगरद:यात वसले आहे.  या छोटय़ाशा गावात किशोर पाटील  यांनी त्यांचे वडील व आदर्श शिक्षक स्व.रमेश सहादू पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  कुंझर जि.प. शाळेला प्रवेशद्वार बांधून दिले आहे.   वडिलांच्या  नवव्या पुण्यतिथीनिमित्त 9 अनाथांना त्यांनी शैक्षणिक साहित्यही स्वखर्चाने दिले. असे विविध उपक्रम त्यांनी राबविले असून पुढेही अशीच कामे करण्याचा त्यांचा मानस आहे.12 वीमध्ये विज्ञान शाखेत ‘क्रॉप प्रॉडक्शन’ विषयात 100 पैकी 99 गुण होते. बीएससी अॅग्रीला सहज संधी मिळणार होती मात्र वडिलांच्या प्रभावानुसार समाज घडविण्याच्या दृष्टीने शिक्षक बनण्याचा निर्धार केला. जि.प. शाळा टिकवण्यासाठी व स्वत:च्या पाल्यांना जि.प. शाळेतच दाखल केले. यामुळे इतर पाल्यांचाही शाळेकडे पाहण्याचा दृष्टीकोन निश्चितच बदलतो. एखाद्या शिक्षकाची मुले त्याच्याच शाळेत असली तर शैक्षणिक दर्जाकडे सहाजिकच त्याचे  अधिक लक्ष राहील, असे मला वाटते.- किशोर पाटील