शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय महिलेचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: October 22, 2016 13:19 IST

भुसावळ शहरातील एचडीएफसी बँकेमागील रेल्वे रूळाजवळ परप्रांतीय महिलेचा मृतदेह आढळला असून तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

गणेश वाघ, ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. २२ - शहरातील एचडीएफसी बँकेमागील रेल्वे रूळाजवळ परप्रांतीय महिलेचा मृतदेह आढळला असून या महिलेचा खून करून मृतदेह फेकल्याचा संशय वर्तवला जात आहे. लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आठ वाजेपूर्वी जळगाव रस्त्यावरील एचडीएफसी बँकेमागे ३५ ते ४० वर्षीय महिलेचा मृतदेह असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर निरीक्षक डी़बी़सरक, लोहमार्ग गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक उज्वल पाटील यांच्यासह सहका-यांनी धाव घेतली़ रेल्वे रूळाला लागून असलेल्या नाल्यातच  मृत महिला आढळली़. महिलेच्या डोक्याला मोठ्या प्रमाणावर इजा झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता.  महिलेचा खून करून मृतदेह तेथे टाकण्यात आला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
या संदर्भात लोहमार्गचे निरीक्षक सरक म्हणाले की, खुनाची शक्यता वाटत नाही मात्र आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतरच अधिक काही सांगता येईल. महिलेच्या हातावर लिहिलेल्या नावावरून ती परप्रांतीय असावी़ असा अंदाज व्यक्त होत आहे.