शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सुनील झंवर न्यायालयाला शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:16 IST

वॉरंट करून घेतले रद्द : कंडारेचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील ...

वॉरंट करून घेतले रद्द : कंडारेचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर हा पुण्याच्या विशेष न्यायालयाला ५ मार्चला स्वत: शरण आला असून त्याने फरार घोषित होण्याचे वॉरंट रद्द करून घेतले आहे.

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुण्याच्या विशेष न्यायालयाने मुख्य संशयित सुनील झंवर व जितेंद्र कंडारे यांना फरार घोषित करण्यासाठी १२ फेब्रुवारीला घोषणापत्र जारी केले होते. त्यानुसार तीस दिवसांच्या आत अर्थात १४ मार्चपर्यंत दोघा मुख्य संशयितांना न्यायालय, पोलिसांना शरण येण्याचे वॉरंट काढण्यात आले होते. दरम्यान, पुढील आठवड्यात वॉरंटची मुदत संपुष्टात येऊन दोघांना फरार घोषित करण्यात येणार होते. त्याचबरोबर त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली असती. मात्र, त्यापूर्वी सुनील झंवर हा पुण्याच्या विशेष न्यायालयाला शरण आला आहे. त्याने वॉरंटही रद्द करून घेतले. त्यामुळे त्यास १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

अटकपूर्व जामीन अर्ज

जितेंद्र कंडारे यालाही १४ मार्चपर्यंत शरण येण्याचे वॉरंट काढलेले आहे. त्यापूर्वी त्याने पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला असून त्यावर १२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे़ दरम्यान, सूरज झंवर यानेही सुध्दा मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर १० मार्चला निकाल होईल. संशयित विवेक ठाकरेच्याही जामीन अर्जावर २४ मार्च रोजी निकाल आहे.