शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

१७१ शेतकºयांच्या आत्महत्या

By admin | Updated: January 5, 2017 00:10 IST

शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे ९० प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले आहे तर ३० प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने मृत्यूनंतरही वारसांची वणवण कायम आहे.

जळगाव : कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाचा लहरीपणा या साºयाला कंटाळून जिल्ह्यातील तब्बल १७१ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे ९० प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले आहे तर ३० प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने मृत्यूनंतरही वारसांची वणवण कायम आहे.१७१ शेतकºयांच्या आत्महत्या निसर्गाची अवकृपा, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज तसेच  शेतमालाला नसलेला भाव  यासाºयात खचलेल्या १७१ शेतकºयांनी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.  ९० शेतकºयांच्या वारसाची मृत्यूनंतरही वणवणशासनाने शेतकरी आत्महत्येनंतर वारसांना मदतीची घोषणा केली आहे. यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीकडे आलेल्या १७१ मदतीच्या प्रस्तावातून या समितीने तब्बल ९० प्रस्ताव अपात्र ठरविले आहे. त्यामुळे मृत्युनंतरही या शेतकºयांच्या वारसाची शासनाकडून उपेक्षा कायम आहे.दुष्काळी व नापिकीमुळे आत्महत्येचे प्रमाणगेल्या दोन वर्षांपासून दुष्काळीस्थिती आणि अवकाळी पाऊस अशी स्थिती कायम असल्याने बळीराजा पार कोलमडला आहे. त्यातच दोन वर्षापासून आत्महत्येच्या प्रमाणात जास्त वाढ झाली आहे. २०१३ मध्ये ९२ शेतकºयांनी आत्महत्या केली होती. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन हा आकडा १७४ पर्यंत पोहचला. तर जानेवारी ते डिसेंबर या काळात तब्बल १७१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.२७ हजार शेतकरी अनुदानापासून वंचितगेल्यावर्षी सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात वादळी पाऊस होऊन शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील ४० गावांमधील २ हजार २९८ शेतकºयांच्या १ हजार १९१.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. तर आॅक्टोबर महिन्यात १७१ गावांमधील २५ हजार २९३ शेतकºयांचे ११ हजार ८७५.०७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. २७ हजार ५९१ शेतकºयांना शासनाने मदत उपलब्ध करून द्यावी या आशयाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दीड महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठविला आहे. मात्र अजूनही त्यावर निर्णय न झाल्याने हे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.