शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दहाव्या दिवशीच तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, करिना हिचा पती दूध फेडरेशनमध्ये कामाला आहे तर सासऱ्यांची मालवाहू गाडी आहे. सकाळी उठल्यानंतर करिना हिने ...

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, करिना हिचा पती दूध फेडरेशनमध्ये कामाला आहे तर सासऱ्यांची मालवाहू गाडी आहे. सकाळी उठल्यानंतर करिना हिने पती व सासऱ्यांचा जेवणाचा डबा तयार करुन दिला. ते कामाला गेले होते तर सासू बाहेर गेली होती. घरात फक्त दीर नागेश हाच होता. नागेश झोपेतून उठल्यावर चहासाठी आईला शोधत असतानाच एका खोलीत पत्र्याचा आवाज आला, आवाजाच्या दिशेने जाऊन बघितले असता, करिनाने गळफास घेतल्याचे दिसून आले. नागेशसह इतरांनी करिना हिस तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. मयत करिना हिच्या पश्‍चात पती सागर, दीर नागेश, सासरे राजू वासुदेव निकम व सासू निर्मलाबाई तसेच आजी गंगाबाई,आई सुलोचना भालेराव रा. खिरोदा ता. रावेर असा परिवार आहे.

रुग्णालयात उडाला गोंधळ

दरम्यान, करिना हिने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत तिचे पतीसह सासरच्यांनी घातपात केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात माहेर तसेच सासरचे नातेवाईक एकमेकांसमोर आल्याने गोंधळ उडाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हापेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

आई म्हणते मुलीने लग्न केल्याचे माहितीच नव्हते

करिना यावल तालुक्यातील न्हावी येथे आजी गंगाबाई भालेराव यांच्याकडे शिकायला होती. आजीच्या सहमतीने करिना हिचा ११ जुलै २०२१ रोजी जळगाव शहरातील सागर राजू निकम या तरुणाशी विवाह पार पडला होता. करिनाची २००५ ची जन्मतारीख असून ती १५ वर्षांची आहे, तिचा लग्नाला नकार होता. या लग्नाबद्दल थेट लग्नाच्या दिवशीची माहिती मिळाली होती. तिला मारझोड तसेच दमदाटी करुन सासरे राजू निकम तसेच त्यांच्या इतर नातेवाईकांनी जबरदस्तीने करिनाचा विवाह केला. करिना मरायला खूप घाबरत होती, त्यामुळे ती आत्महत्या करु शकत नाही, तिला सासरच्यांनीच मारले असल्याचा आरोप करिनाची आई सुलोचना हिने जिल्हा रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना केला.

सासरचे म्हणतात, करिनाला आई-वडील नसल्याची माहिती मिळाली

करिनाच्या आईने केलेल्या आरोपाबाबत करिनाचे सासरे राजू सुकदेव निकम यांना विचारले असता ते म्हणाले की, करिना हिला आई किंवा वडील आहेत याबाबत आम्हाला कुठलीच माहिती नव्हती. आई, वडील नसलेली मुलगी आजीकडे राहते. शेतात जाऊन काम करते, तिचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या उद्देशातून करिना तसेच तिच्या आजीच्या संमतीने आम्ही स्वखर्चाने लग्न केले. ती अल्पवयीन नव्हती, तिचे वय १९ वर्षे होते. करिना हिने आत्महत्या केली, याचा आम्हालाही धक्का बसल्याचे राजू निकम म्हणाले.