गुरुवारी दुपारी १ वाजता नगर परिषदेच्या अभ्यासिकेत माता सरस्वती व कै. शेठ बक्तावरमल चोरडिया यांच्या प्रतिमेचे अनावरण व पुस्तकांचे लोकार्पण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
पुस्तक हे एकप्रकारे ज्ञानाची तिजोरी आहे. भडगावपासून इतर तालुक्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. अशा वास्तू विविध ठिकाणी उभ्या राहिल्या पाहिजे. येथील योगदानाबद्दल चोरडिया परिवारातील सर्वांची स्तुती डॉ. अभिजित राऊत यांनी केली. यावेळी आमदार किशोर पाटील, पाचोरा उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार सागर ढवळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, जिल्हा बँकेचे माजी संचालक शांताराम पाटील, पाचोरा नगराध्यक्ष संजय गोहील, भडगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी नगरसेविका योजना पाटील, सुशिला पाटील आदी उपस्थित होते.
६१ वर्षांनी हेतू साध्य
१९६० साली शेठ बक्तावरमल चोरडिया यांच्या मुलांनी ही जागा येथील वाचनालय कामी दिली होती. आज ६१ वर्षांनी वाचनालयाची इमारत उभी राहिल्याने नव्या विद्यार्थ्यांना दिशा मिळून अभ्यास करून अधिकारी घडू शकतील हा त्यांचा हेतू साध्य झाला. यासाठी सचिन चोरडिया यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. या वास्तूकामी सचिन चोरडिया, आनंद जैन, नंदलाल ललवाणी यांनी अभ्यासिकासाठी भरीव मदत केली आहे. यावेळी चोरडिया परिवारकडून वाचनालयात ५० हजारांची अनेक स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट देण्यात आली. दरम्यान, वाचनालयाच्या इमारतीला सीसीटीव्हीची गरज असल्याची मागणी योगेश शिंपी यांनी आमदारांकडे मांडली. त्यावर उत्तर देताना आमदारांनी डीपीडीसीमधून पाचोरा शहराप्रमाणे भडगाव शहरही सीसीटीव्हीमय झाले पाहिजे, यासाठी जिल्हाधिकारीचे लक्ष वेधले.
सुरुवातीला सचिन चोरडिया व मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी प्रास्ताविक केले. ईश्वस्तवनपर सरस्वती स्तोत्र पौर्णिमा चोरडिया यांनी, तर सूत्रसंचालन योगेश शिंपी यांनी केले. आभार सचिन चोरडिया यांनी मानले.
यानंतर नगर परिषदेने आंचळगाव रस्त्यावरील गट नं. ५३६ मध्ये उभारलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची जिल्हाधिकारी अभिजित राऊत व आमदार किशोर पाटील यांनी पाहणी केली. यावेळी सोबत पाचोरा उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार सागर ढवळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी हजर होते. भडगावकडे येत असताना याच रस्त्यावरील शेतकरी नाना हाडपे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना विनंती केल्यानुसार नाना हाडपे यांचे शेतात कांदे लागवड सुरू असताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट दिली.