शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नऊ दिवसात पाचव्यांदा वादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST

गत मंगळवारी सातपुड्याच्या पायथ्यालगत अहिरवाडी, मोहगण व पाडळे शिवारातील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर गुरूवारी खिर्डी, वाघाडी, रेंभोटा, धामोडी, शिंगाडी, कोळदा, ...

गत मंगळवारी सातपुड्याच्या पायथ्यालगत अहिरवाडी, मोहगण व पाडळे शिवारातील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर गुरूवारी खिर्डी, वाघाडी, रेंभोटा, धामोडी, शिंगाडी, कोळदा, सुलवाडी, भामलवाडी, कांडवेल, ऐनपूर, निंबोल, विटवे व निंभोरासीम शिवारातील अंदाजे ७५८ हेक्टर क्षेत्रात वादळी पावसाने दुसरा तडाखा दिला. त्यात केळीबागा जमीनदोस्त होऊन व ५१२ घरांची पडझड होऊन ४०.३० कोटी रु. नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या पंचनाम्यांना सुरुवात झाली न झाली तोच पुन्हा शनिवारी पाल, गुलाबवाडी, जिन्सी, मस्कावद, सिंगत, बलवाडी व थोरगव्हाण परिसरातील वादळी पावसाचा तिसरा तडाखा बसून अंदाजे १८९ हेक्टरमधील केळीबाग जमीनदोस्त होऊन तर ८१ घरांची पडझड होऊन अपरिमित ८ कोटींची अपरिमित हानी झाली होती.

दरम्यान, सोमवारी रात्री उटखेडा-भाटखेडा परिसरात वादळी पावसाने चौथ्यांदा तडाखा दिल्याने शेकडो हेक्टर केळीबागा उद्ध्वस्त झाल्याची शोकांतिका आहे.

किंबहुना, बुधवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास तुफान वादळी व मुसळधार पावसाच्या तडाख्यात मंगरूळ, जुनोने, मोहगण, पिंप्री, अहिरवाडी, पाडळे बुद्रूक, कर्जोद, भोकरी शिवारातील ऐन कापणीवरील केळीबागा उन्मळून जमीनदोस्त झाल्याने कोट्यवधी रुपयांचा केळीमाल मातीमोल झाला आहे.

शेताच्या बांधावरील बहुतांशी झाडं तथा रस्त्यालगतची झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने केऱ्हाळेहून पिंप्री, मंगरूळ, जुनोने, कर्जोद व अहिरवाडी शिवारात जाणारे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. ऐन हातातोंडाशी आलेला केळी उत्पादनाचा घास हिरावून घेतल्याने तथा जमीनदोस्त झालेल्या केळीबागांची सफाई करून पुन्हा ते क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे संकट आ वासून असल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या वादळी पावसात जुनोने, मंगरूळ, पिंप्री, मोहगण, अहिरवाडी, कर्जोद, वाघोड गावांचा व शेतीशिवारातील वीजखांब तथा वीजतारांवर झाडे उन्मळून तारा तुटून आज रात्री उशिरापर्यंत तब्बल १२ ते १६ तासांनंतरही वीजपुरवठा खंडित झाल्याने नळपाणीपुरवठा योजनाही विस्कळीत झाला आहे.

दरम्यान, आज तहसीलदार उषाराणी देवगुणे, खानापूर भाग मंडळाधिकारी विठोबा पाटील, कृषी पर्यवेक्षक अनिल महाजन, कृषी सहाय्यक तडवी व सर्व सजा तलाठी यांनी शेतीशिवारातील पाहणी करून ६५४ शेतकऱ्यांच्या ६१७ हेक्टर क्षेत्रातील केळी बागा जमीनदोस्त होऊन २४ कोटी ४८ लाख २० हजार रु.चे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व तालुका कृषी अधिकारी एम.जी.भामरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.