शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका प्रशासनाकडून शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर, २६ मार्चपासून शहरातील १६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिका प्रशासनाकडून शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर, २६ मार्चपासून शहरातील १६ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांनी मनपा कामबंद आंदोलन सुरू केले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर गाळेधारकांनी आंदोलनाला स्थगिती देत पुन्हा आपली दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे. हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिली आहे.

महापालिका प्रशासनाकडून महासभेत मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाडे वसूल करून, सर्व गाळे ताब्यात घेऊन याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात येणार होता. या पार्श्वभूमीवर शहरातील १६ व्यावसायिक मार्केटमधील सुमारे २५०० गाळेधारकांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यात आता हा ठराव मंजूर झाला असल्यामुळे व दुसरीकडे दोन महिन्यांपासून गाळेधारकांना वर निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे गाळेधारकांनी कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने ठराव मंजूर केला असला तरी, १६ अव्यवसायिक मार्केटमधील गाळेधारकांबाबत मनपा प्रशासन व पदाधिकारी सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मनपा प्रशासनाकडे संबंधित ठरावाची प्रत मागितली असून, ही प्रत मिळाल्यानंतर गाळेधारक आपली भूमिका स्पष्ट करतील, अशीही माहिती गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

दोन महिन्यांपासून व्यवसाय ठप्प असल्याने घेतला निर्णय?

जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यामुळे, मुदत संपलेल्या अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भविष्यात मनपा प्रशासनाकडून गाळेधारकांवर कारवाई करण्यात आली तर सर्व गाळेधारक आपल्या कुटुंबीयांसोबत आंदोलनात उतरतील, असा इशारादेखील गाळेधारक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

कोट..

दोन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने, गाळेधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे तूर्तास आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असला, तरी भविष्यात मनपाकडून कोणतीही कार्यवाही झाल्यास त्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याची तयारी आमची आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आज आमची पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल.

- डॉ. शांताराम सोनवणे, अध्यक्ष, गाळेधारक संघटना