शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

समांतर रस्त्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: January 5, 2017 00:29 IST

जळगाव : समांतर रस्त्याच्या रेंगाळलेल्या प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून महापालिकेकडून गुरूवारी जिल्हादौºयावर येत असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे

जळगाव : समांतर रस्त्याच्या रेंगाळलेला प्रश्न  व उड्डाणपुलाचे काम या प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून महापालिकेकडून गुरूवारी जिल्हादौºयावर येत असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे. समांतर रस्ता व पुलांच्या कामासाठी  मदत मिळावी असे साकडे त्यांना  घातले जाणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. मात्र पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने तातडीने त्यावर निर्णय होण्याची अपेक्षा मात्र मावळली आहे.समांतर रस्त्याच्या विषयावर मनपा पदाधिकाºयांनी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची  भेट घेतली होती.  समांतर रस्त्यांच्या कामांसाठी तसेच इतर रेंगाळेल्या विषयात मदतीचे मंत्र्यांनी आश्वासनही दिले होते. महामार्ग मृत्यूचा सापळामहामार्गावरील रहदारी गेल्या काही वर्षात प्रचंड वाढली आहे. प्रत्येक क्षणाला मोठमोठी अवजड वाहने या रस्त्यावरून येत-जात असतात. जळगाव शहराची दोन भागात विभागणी आहे. शहराचा एक मोठा भाग हायवेच्या पुढे आहे. त्यामुळे लाखो लोकांना रोज महामार्ग ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नसतो. बºयाच वेळेस घाईत महामार्ग ओलांडत असताना अपघातही होत असतात. या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने समांतर रस्त्स्याची गरज ही आता जास्तच वाढली आहे. अर्धे शहर महामार्गाच्या पुढेपाच लाख लोकसंख्येच्या जळगाव शहराची अर्धी लोकसंख्या दररोज महामार्ग ओलांडत असते. कारण महामार्गालगत अनेक शाळा, कॉलेजेस, शिक्षणसंस्था, वाणिज्यक आस्थापना, एमआयडीसी आहे. काही विशिष्ट वेळात तर महामार्ग ओलांडणाºया लोकांची संख्या ही प्रचंड असते. त्यामुळे अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौफुली, आकाशवाणी चौफुली, प्रभात चौफुली पुढे शिवकॉलनी, खोटे नगर या भागात वाहनांची नेहमी कोंडी होत असते. यातूनच अपघात होतात. गेल्या काही दिवसात तर या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने समांतर रस्त्यांची मागणी वाढली आहे. मनपा देणार पालकमंत्र्यांना पत्रशहरातील उड्डाण पुल व समांतर रस्त्यांसाठी मदत मिळावी म्हणून मनपाचे शिष्टमंडळ सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना या कामांसाठी मदत मिळावी म्हणून साकडे घालणार आहे. महापौर नितीन लढ्ढा यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांची भेट घेणार आहे.